वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पळस्पे फाटा, राहूल हॉटेल परिसर तसेच मुंबई-पुणे महामार्गावर पडलेले खड्डे बुजवले. या उपक्रमामुळे वाहतूक सुरळीत झाली असून प्रवाशांना सुरक्षित व वेगवान मार्गक्रमण शक्य झाले आहे.
या कार्याची चाकरमानी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून प्रशंसा होत आहे. सणासुदीच्या गर्दीत पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि सामाजिक जाणिव ही "लोकसेवेत पोलीस" हे तत्त्व प्रत्यक्षात उतरवणारी ठरली आहे.
स्थानिकांनी सांगितले की, "पूर्वी तासन्तास वाहतूक कोंडीत अडकावे लागायचे, आता मात्र प्रवास सुकर झाला आहे. पनवेल पोलिसांचा हा उपक्रम खर्या अर्थाने कौतुकास्पद आहे."
हा उपक्रम फक्त वाहतूक सुरळीत करण्यापुरताच मर्यादित न राहता, सार्वजनिक हितासाठी पोलिसांची सामाजिक जबाबदारीही अधोरेखित करतो. इतर भागांतील पोलिसांसाठीही हा एक प्रेरणादायक आदर्श ठरू शकतो.