
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सलग दुसऱ्यांदा सकाळच्या सत्रात वाढ झाल्याने शेअर बाजाराला आज चांगली सुरूवात मिळाली आहे. सकाळच्या सत्रात गिफ्ट निफ्टीत वाढ झाल्यावरच वाढीचे संकेत मि ळत होते. सेन्सेक्स २७२.८४ अंकाने वाढला असून निफ्टी ७८.३० अंकाने वाढला आहे. आज सुरूवातीच्या सत्रात तेजीत असलेला ऑटो समभागात घसरण झाली असून आयटी समभागात मोठी वाढ झाली असल्याने आज बाजारात सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली. याशिवाय जागतिक अस्थिरतेत सूरू असलेल्या द्वंद्वात गुंतवणूकदारांनी आयटी समभागात चांगला कौल दिला असला तरी आज निफ्टी विकली एक्सपायरी असल्याने आजही नफा बुकिंगसह बाजारात सेल ऑफ होण्याची शक्यता अधिक असल्याने अखेर च्या सत्रात वाढ राखता येईलच याची मात्र शाश्वती नाही. आज बीएसई नेक्स्ट ५० निर्देशांकात २२०.३४ अंकांने वाढ झाली आहे.
अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ०.०४% वाढ झाली असली तरी निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील प्रतिसादावर व आजच्या डॉलर व रूपयांच्या हालचालींवर पुढील हालचाल अवलंबून राहील. सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ रेलटेल कॉर्पोरेशन (५.२० %), इंजिनियर्स इंडिया (४.०६%), इन्फोसिस (३.६०%), इंटलेक्ट डिझाईन (३.५७%), टीबीओ टेक (३.०९%), जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चर (३.००%), इक्लर्क सर्विसेस (२.७३%), विप्रो (२.५१%),गॉडफ्रे फिलिप्स (२.०९%), अदानी पॉवर (१.९३%), टेक महिंद्रा (१.६ ५%), इन्फोऐज इंडिया (१.६५%) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण नेटवेब टेक्नॉलॉजी (४.०७%), जीएमडीसी (२.८०%), स्विगी (२.२९%), चालेट हॉटेल (२.१५%), वी गार्ड इंडस्ट्रीज (१.५१%), स्टार हेल्थ इन्शुरन्स (१.४६%), एमसीएक्स (१.४२%), मेट्रोपॉलिस हेल्थ (१.३८%), वन ९७ (१.४२%) वोडाफोन आयडिया (१.३७%), श्री रेणुका शुगर (१.३२%), लेमन ट्री हॉटेल (१.२०%), बीएसई (१.१८%), बाटा इंडिया (१.१८%) समभागात झाली आहे. विशेषतः आज दोन्ही बाजारात मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये वाढ झाल्याने आज बाजारात सकाळच्या सत्रात वा ढ झाली असली तरी जागतिक अस्थिरतेसह ती मर्यादित पातळीवर राहिली आहे.