मुंबई : गणेशोत्सवानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. पण ही विश्रांती काही दिवसांपुरतीच मर्यादीत आहे. पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोकण विभाग वगळता संपूर्ण मराठवाडा, खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत गुरुवार ११ सप्टेंबरपर्यंत पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, मराठवाडा वगळता संपूर्ण विदर्भ, खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत १२ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढू शकेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईसह संपूर्ण कोकण तसेच मराठवाड्यातील १५ जिल्ह्यांत केवळ तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.






