मोहित सोमण : आतापर्यंतच्या इतिहासात सोन्यात उच्चांकी वाढ झाली आहे. भूराजकीय स्थितीचा फटका बसल्याने भारतीय सराफा बाजारात सोने नव्या उच्चांकावर गेले. आज 'गुडरिट र्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १३६ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १२५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०२ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ११०२९ रूपये, २२ कॅरेटसाठी १०११० रूपये, १८ कॅरेटसाठी ८२७२ रूपयांवर पोहोचले आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १३६० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १२५० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याचे प्रति तोळा दरात १०२० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा २४ कॅरेट दर ११०२९० रूपयांवर, २२ कॅरेट दर १०१००० रुपयांवर, १८ कॅरेट दर ८२२७० रूपयांवर पोहोचला आहे.
मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी ११०७३ रूपयांवर, २२ कॅरेटसाठी १०११० रूपयांवर पोहोचले आहेत. जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत ०.१२% वाढ झाली आहे. तर जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात दुपारपर्यंत ०.१८% वाढ झाल्याने प्रति युएस डॉलर दरपातळी ३६४२.९९ प्रति औंसवर पोहोचली आहे. कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये सोन्याचा निर्देशांकात ०.४७% वाढ झाली असल्याने दरपातळी १०९०२५.०० रूपयांवर पोहोचली आहे.
आज सकाळच्या सत्रातच सोन्याच्या निर्देशांकात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. युएस बाजारातील घटलेल्या कामगार आकडेवारी, तसेच कमकुवत रोजगार आकडेवारीनंतर डॉलरवर दबाव पातळी निर्माण झाली. तसेच या फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीवरून गोल्ड स्पॉट बेटिंग मध्ये झाल्याने अचानक सोन्याच्या मागणीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयातही घसरण झाली. परिणामी भारतीय बाजारातील कमोडिटीतील किंमती वाढल्या आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सातत्याने सुरू होत असल्याने भारतीय कमोडिटी मोठी वाढ होत आहे. भारतीय गुंतवणूकदारही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला सणासुदीच्या काळात अधिक महत्व देत असल्याने आज बाजारात ईटीएफसह प्रत्यक्ष सोन्यातील गुंतवणूकीत वाढ झाली आहे.