मोहित सोमण : आज गिफ्ट निफ्टीत सकाळी ६.४६ वाजता वाढ झाल्याने सुरूवातीच्या सत्रात वाढीचे संकेत मिळत आहेत. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स २५४.५१ अंकाने उसळला असून निफ्टी ८४.४५ अंकाने उसळला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात सकाळच्या सत्रात १५३.३२ अंकाने वाढ झाली असून बँक निफ्टीत १४१.८५ अंकांने वाढ झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५०%, ०४९% वाढ झाली तर निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७३%,०.५२% वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) कंज्यूमर ड्युरेबल्स (०.०७%) वगळता इतर समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ ऑटो (१.५४%), मेटल (१.२६%), मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.६४%), तेल व गॅस (०.५७%) निर्देशांकात झाली आहे.
असे असले तरी आजचा दिवस व हा संपूर्ण आठवडा हा अस्थिरतेचा नमुना असू शकतो. कारण सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा १.११% उसळला आहे.संपूर्ण आठवड्यात एकीकडे भारत व युएस यांच्यातील संबंधातील चढ उतार बाजारात अधोरेखित होऊ शकतात दुसरीकडे युएस बाजारातील अनेक महत्वाची आकडेवारी या आठवड्यात जाहीर होत असल्याने त्याचा मूलभूत परिणाम शेअर बाजारात होऊ शकतो. शुक्रवारी अमेरिकेतील रोजगार आकडेवारी जाहीर झाली जी अपेक्षेपेक्षाही कमी झाली आहे. नव्या आकडेवारीत ऑगस्टमध्ये केवळ २२००० नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. तर बेरोजगारी २०२१ नंतर सर्वाधिक नव्या निचांकी पातळीवर पोहोचली आहे. अशातच युरोपियन बाजारात जर्मन ट्रेड डेटा प्रकाशित होणार आहे मंगळवारी फ्रेंच औद्योगिक उत्पादन आकडेवारी, गुरूवारी युएस बाजारातील महागाई आकडेवारी, शुक्रवारी जर्मन महागाई आकडेवारी, व युएस जीडीपी आकडेवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण आठवडा गुंतवणूकदारांसाठी अस्थिरतच राहू शकतो. त्यामुळे याच आठवड्यात युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात किती प्रमाणात सप्टेंबर महिन्यात होणार याची निश्चिती मिळणार आहे. भारत व युएस टॅरिफ प्रश्नावरही गुंतवणूकदारांमध्ये प्रश्नचिन्ह कायम आहे.
भारतात जीएसटी प्रणाली सुधारणेसह मोठ्या प्रमाणात जीएसटी कपातीमुळे उत्साहाचे भरते भारतीय बाजारात आहे. औद्योगिक विश्वातून या निर्णयाचे स्वागत होत आहे मात्र दुसरीकडे रूपयात होणारी घसरण, तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) काढून घेतली जाणारी गुंतवणूक हा देखील चिंतेचा विषय आहे. त्यामुळे सकाळच्या सुरुवातीच्या कलात बाजारात वाढ अपेक्षित असली तरी अस्थिरता निर्देशांक बाजी पलटवेल का हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
गेला संपूर्ण आठवड्यातील सुरूवातीला बाजारात घसरण झाली असली तरी शेवटच्या काही दिवसात बाजारात किरकोळ अथवा मोठी रॅली झाली होती. अशातच सोमवारच्या सत्रात अस्थिरतेचे आवाहन कायम असले तरी युएस बाजारातील आयटीतील दबाव भारतीय आयटी शेअर्समध्ये कायम राहतो का यावरही बाजारातील पुढील दिशा मार्गक्रमण करेल. आज आयटी, फायनांशियल सर्विसेस, मेटल, फार्मा, रिअल इस्टेट समभाग (Stocks) महत्वाची भूमिका पार पाडतील. मात्र त्याच बरोबर मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये होणारी वाढही निर्देशांकाताला मुहुर्त स्वरूप देऊ शकते.
काल युएस बाजारातील डाऊ फ्युचर (०.१६%) अंकांने उसळला असला तरी शुक्रवारी डाऊ जोन्स (०.४८%) अंकांने घसरला होता. काल एस अँड पी मध्ये मात्र ०.१६% वाढ झाली होती. आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.३१%) सह निकेयी २२५ (१.८६%), स्ट्रेट टाईम्स (०.११%), हेंगसेंग (०.३२%), तैवान वेटेड (०.५२%), शांघाई कंपोझिट (०.३२%) बाजारात वाढ झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ टीबीओ टेक (७.५२%), जीएमडीसी (५.००%), जेपी पॉवर वेचंर (४.९८%), अदानी पॉवर (४.५८%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (४.०३%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.५८%), ब्रेनबीज सोलूशन (३.५२%), सेल (२.९५%), ओला इलेक्ट्रिक (२.५८%), इंडिया सिमेंट (२.७५%), टाटा स्टील (२.६७%), भारत फोर्ज (२.६२%), टाटा मोटर्स (२.४१%), वेदांत फॅशन (२.२२%), एचपीसीएल (२.२०%), सारेगामा इंडिया (२.५२%), एम अँड एम (२.०६%), एचडीएफसी एएमसी (१.१२%), अदानी पोर्टस (१.११%), एल अँड टी फायनान्स (१.०८%) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण बिकाजी फूडस (२.३७%), गोदरेज इंडस्ट्रीज (२.३५%), पीव्हीआर आयनॉक्स (१.८६%), ईआयडी पेरी (१.६२%), निवा बुपा हेल्थ (१.८३%), वी गार्ड इंडस्ट्रीज (१.५९%), ब्लू स्टार (१.५७%), वेदांता (१.५४%), गो डिजिट जनरल (१.५०%), जिलेट इंडिया (१.४७%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (१.४१%), श्री रेणुका शुगर (१.१८%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (०.५३%), एमआरएफ (०.३९%) समभागात झाली आहे.
आजच्या सुरूवातीच्या कलावर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'अमेरिका-भारत व्यापार संबंधांभोवती वाढलेली अनिश्चितता बाजारपेठांवर सतत परिणाम करत राहील. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी "विशेष अमेरिका-भारत संबंध" आणि "चिंता करण्यासारखे काहीही नाही" या संदर्भात अलिकडच्या काळात दिलेली विधाने ताणलेल्या संबंधांमध्ये सुधारणा दर्शवितात. तथापि, रशियाविरुद्धच्या दुसऱ्या फेरीच्या निर्बंधांवरील ट्रम्प यांचे भाष्य आणि पीटर नॅवारो यांचे भारताविरुद्ध सततचे टीकाटिप्पणी हे नकारात्मक घटक आहेत. भारताच्या आयटी निर्यातीवर संभाव्य निर्बंधांच्या अफवा देखील आहेत, जरी सेवांमधील व्यापार आतापर्यंत परस्पर शुल्काने अस्पृश्य राहिला आहे. या चिंता बाजारावर परिणाम करत राहतील ज्याला जीएसटी सुधारणांमुळे उत्साह मिळाला. जीएसटी सुधारणांमुळे झालेला उत्साह अल्पकाळ टिकला कारण बाजाराने जीएसटी दर कपात अंशतः सूट दिली होती.
२२ सप्टेंबरनंतर जेव्हा नवीन जीएसटी दर लागू होतील, तेव्हा मागणीत मोठी वाढ होईल, विशेषतः ऑटोमोबाईल्स आणि ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी. यामुळे बाजारातील भावना उंचावण्याची क्षमता आहे.'
आजच्या बाजारातील सुरूवातीच्या कलावर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक अमृता शिंदे म्हणाल्या आहेत की,' भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज सकारात्मक दिशेने उघडण्याची शक्यता आहे, गिफ्ट निफ्टी निफ्टी ५० मध्ये जवळपास ८० अंकांनी वाढ दर्शवित आहे. बाजारातील भावना सावधपणे आशावादी राहिल्या आहेत, जरी सततची अस्थिरता आणि मिश्रित जागतिक संकेत गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम करत आहेत. तांत्रिक आघाडीवर, गेल्या आठवड्याच्या मध्यात झालेल्या तीव्र विक्रीनंतर निफ्टीने लवचिकता दाखवली २४६३३ पातळीच्या जवळ १००-दिवसांच्या ईएमए (Exponential Moving Average EMA) वरून जोरदारपणे पुनरागमन केले. निर्देशांकाने दैनिक चार्टवर एक हॅमर कॅंडलस्टिक पॅटर्न तयार केला, जो कमी पातळीवर खरेदीची आवड दर्शवितो. की आधार २४६००-२४२८० पातळीच्या आसपास ठेवला आहे, जिथे १००-दिवस आणि २००-दिवसांचे ईएमए (EMA) एकत्र येतात. २५००० पातळीच्या वरचा निर्णायक बंद हा चढउताराचा पुढील टप्पा निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा असेल, जो संभाव्यतः २५५००-२५६७५ पुरवठा क्षेत्राकडे (Supply Side) जाण्याचा मार्ग उघडेल. शुक्रवारी बँक निफ्टी ५४११४.५५ पातळीवर स्थिर राहिला, दिवसाच्या नीचांकी पातळीपासून जवळजवळ ३९० अंकांनी सावरला आणि ५४,००० पातळीच्या वर टिकून राहिला. आठवड्याच्या चार्टवर, निर्देशांक ५४५५०-५३५५० पातळीच्या बाजूला व्यापार करत होता, समर्थन २०० दिवसांच्या ईएमए (EMA) जवळ संरेखित होत होता. आठवड्यासाठी, बँक निफ्टी ४५८ अंकांनी वाढला आणि हिरव्या रंगात बंद झाला, जो महत्त्वपूर्ण समर्थन पातळींवर लवचिकता दर्शवितो. ५३५५० पातळीच्या खाली ब्रेकडाउन ५३००० आणि ५२५०० पातळीच्या दिशेने आणखी सुधारणा घडवून आणू शकतो, तर ५४५५० पातळीच्या वर ब्रेकआउटमुळे ५५००० आणि ५५३०० पातळीच्या वाढीच्या लक्ष्यांसह नवीन खरेदीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) ५ सप्टेंबर रोजी १३०४ कोटी किमतीचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) त्याच दिवशी १८२१ कोटी किमतीचे शेअर्स खरेदी केले.
वाढत्या अस्थिरतेची आणि मिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, व्यापाऱ्यांना सावधगिरीने "बाय-ऑन-डिप्स" धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला जातो. रॅलीजवर आंशिक नफा बुक करणे आणि कडक ट्रेलिंग स्टॉप-लॉस राखणे जोखीम व्यवस्थापित करण्यास मदत करेल. निफ्टी २५००० पातळीच्या वर टिकून राहिला तरच नवीन दीर्घ पोझिशन्सचा विचार केला पाहिजे. व्यापक ट्रेंड सावधपणे तेजीत असला तरी, सध्याच्या बाजारातील वातावरणात नेव्हिगेट करण्यासाठी प्रमुख तांत्रिक पातळी आणि जागतिक संकेतांचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक असेल.'
आजच्या सकाळच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'गेल्या आठवड्यात ५० दिवसांच्या एसएमए (Simple Moving Average SMA) वरून कमी झालेला वळण, पुनर्प्राप्ती पुश संपल्याचे संकेत देत होता. परंतु, शुक्रवारी २० दिवसांच्या SMA वरील बंद, सुरुवातीच्या भीतीनंतर असे सूचित करते की वर जाण्यासाठी पुरेशी जोखीम क्षमता आहे. तथापि, २५४०० पातळीच्या पुढे जाण्यासाठी आम्हाला २४८७० वरील पुश कडून पुष्टीकरण आवश्यक असेल. पर्यायीरित्या, २४७०० च्या वर बंद न होणे किंवा २४५०० पातळीच्या खाली पुन्हा थेट घसरण झाल्यास २४०७५,२०० दिवसांचा एसएमए (SMA) तसेच २३८६० चे Fibo विस्तार लक्ष्य पुन्हा उघड होऊ शकते. तथापि, गेल्या आठवड्यापर्यंत स्थिरपणे घसरलेला VIX शुक्रवारी १०.७८ च्या जवळ संपेल हे पाहता, असा निकाल अपेक्षित नाही.'
त्यामुळे आजच्या बाजारातील वाढ अपेक्षित असली तरी मोठ्या रॅलीने होईल का याची शाश्वती नाही. परिणामी आज परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणारी गुंतवणूक व घरगुती गुंतवणूकदारांकडून होणारी गुंतवणूक यांच्यातील गुणोत्तरावर बाजारचा स्तर अवलंबून असेल मात्र तरीही अस्थिरता कायम आहे.