
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांक अखेरीस किरकोळ वाढ आज बंद झाला. शेअर बाजारात आज शेवटच्या सत्रात वाढ झाली असली तरी गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ती निश्चितच समाधानकारक नाही. आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २१० पेक्षा अधि क पातळीवर गेला असताना व निफ्टी ८८ हून अधिक पातळीवर उसळला होता. अखेरच्या सत्रात मात्र वाढीचा वेग मंदावला असून सकाळची अस्थिरता प्रभावी ठरल्याने किरकोळ वाढीसह निर्देशांक स्थिरावला आहे. जागतिक दबावाची व परदेशी संस्थात्मक गुंत वणूकदारांकडून घसरती गुंतवणूक निर्देशांकातील आकडेवारीनुसार साक्ष देते. बाजार बंद होताना सेन्सेक्स ७६.५४ अंकांने बंद होऊन निर्देशांक ८०७८७.३० पातळीवर स्थिरावला आहे. निफ्टी ५० निर्देशांक हा ३२.१५ अंकाने वाढत २४७७३.१५ पातळीवर स्थिरा वला आहे.
सेन्सेक्स बँक निर्देशांकात व बँक निफ्टीत अखेरीस अनुक्रमे ४९.३५ व ७२.३५ अंकांची वाढ झाली होती. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३३, ०.३०% वाढ झाली आहे तर निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५०%,०.१६% वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक अखेरीस संमिश्र प्रतिसादासह बंद झाला आहे. सकाळच्या सत्रात केवळ कंज्यूमर ड्युरेबल्स निर्देशांकात घसरण झाली होती. आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ ऑटो (३.३०%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.५१%), तेल व गॅस (०.२४%), पीएसयु बँक (०.४९%), रिअल्टी (०.४६%) निर्देशांकात वाढ झाली. अखेरीस सर्वाधिक घसरण आयटी (०.९४%), फार्मा (०.२७%), हेल्थकेअर (०.४०%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.३४%) निर्देशांकात झाली आहे.
आज जीएसटी कपातीचा सर्वाधिक फायदा ऑटो, मेटल समभागात झाला असला तरी देखील कंज्यूमर ड्युरेबल्स, फार्मा, आयटी समभागात झालेल्या घसरणीचा फटका क्षेत्रीय निर्देशांकात बसला. पर्यायाने सपोर्ट लेवलचा किरकोळ वाढीसह बाजार बंद झाले. वि शेषतः आजही आगामी फेड व्याजदरात कपातीतील अनिश्चिततेमुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) आपली गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता आहे. युएस बाजारातील कमकुवत रोजगार आकडेवारीनंतर आता आगामी युएस जीडीपी आकडेवारीक डे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. आज अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा ०.५३% उसळला होता जो १% हून अधिक प्रमाणात सकाळी वाढला. अस्थिरता कायम असली तरी वीआयएक्स निर्देशांक मर्यादेत बंद झाल्याने आणखी संभा व्य नुकसान टळले. आज ऑटो समभाग तेजीत राहिल्याने सेन्सेक्स इंट्राडे ८११७१.३८ व निफ्टी इंट्राडे २४८८५.५० पातळीवर पोहोचला होता. अखेरच्या काही काळात मात्र वेग मंदावला. आज ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपपैकी व ऑटो समभागातील टाटा मोटर्स, मा रूती सुझुकी, एम अँड एम या समभागात मोठी वाढ झाली असून वेदांता, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, आयसीआयसी आय बँक, इन्फोसिस या हेवी वेट शेअरमध्ये घसरण झाली आहे. यासह आज भारत व इस्त्राईलने आपल्या भागीदारीत वाढ केल्याने आणखी बा जारात बुस्टर डोस मिळाला.
युएस बाजारातील कालच्या संमिश्र प्रतिसादानंतर आजच्या सुरूवातीच्या कलात एस अँड पी ५०० (०.३२%), नासडाक (०.३१%) बाजारात घसरण झाली आहे. तर डाऊ जोन्स (०.१८%) वाढ झाली आहे. सुरूवातीच्या युरोपियन बाजारातील कलात एफटीएसई (० .१४%), सीएससी (०.४८%), डीएएक्स (०.७४%) निर्देशांकात वाढ झाली आहे. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात गिफ्ट निफ्टीत (०.२४%), निकेयी २२५ (१.४४%), स्ट्रेट टाईम्स (०.०३%), हेंगसेंग (०.८२%), तैवान वेटेड (०.२२%), कोसपी (०.४५%), सेट कंपोझिट (०.१०%), शांघाई कंपोझिट (०.३७%) बाजारात वाढ झाली असून केवळ जकार्ता कंपोझिट (१.२९%) बाजारात घसरण झाली.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ कोहन्स लाईफ (९.७६%), जीएमडीसी (५.९२%), भारत फोर्ज (५.५१%), अशोक लेलँड (४.९९%), जेपी पॉवर वेचंर (४.९८%), मदर्सन वायरिंग (४.६३%), जेएम फायनांशियल सर्विसेस (४.२२%), मदर्सन (४.२०%), टाटा मोटर्स (४.०२%), अदानी पॉवर (३.९६%), एम अँड एम (३.९३%), बजाज ऑटो (३.८४%), आयडीबीआय (३.८३%), आयशर मोटर्स (३.५६%), टीव्हीएस मोटर्स (३.३०%), एचडीएफसी एएमसी (२.५१%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (२.५१%), डेटा पँटर्न (२.५०%), मारूती सुझुकी (२.४४%), टीबीओ टेक (२.३५%), एसएमई सोलार होल्डिंग्स (२.२५%) समभागात झाली आहे.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण अंबर एंटरप्राईजेस (४.११%), ईआयडी पेरी (४.०९%), ट्रेंट (३.८५%),गॉडफ्रे फिलिप्स (३.७६%), ब्लू स्टार (३.५०%), पीव्हीआर आयनॉक्स (३.०१%), एचबीएल इंजिनिअरिंग (२.९२%), त्रिवेणी इंजिनिअरिंग (२.७८%), वे दांता (२.५६%), सुप्रीम इंडस्ट्रीज (२.५३%), बलरामपूर चिनी (२.४२%), मेट्रोपॉलिस हेल्थ (२.४२%), एशियन पेटंस (१.९०%), गोदरेज अँग्रोवेट (१.८९%), बिकाजी फूडस (१.७५%), नेस्ले इंडिया (१.७२%), आरसीएफ (१.४९%), कोल इंडिया (१.४३%), डॉ रेड्डी ज (१.३८%), झेन टेक्नॉलॉजी (१.४०%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (१.३५%), टीसीएस (०.९६%), इन्फोसिस (०.८१%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार विश्लेषक अजित भिडे म्हणाले आहेत की,'आज सकाळ पासुन बाजारातील मुड चांगलाच होता. हळूहळू खरेदी वाढत वाढत स्टील व मेटलमध्ये तेजी दिसत होती.शेवटच्या एका तासात बाजारा तली तेजी फक्त नाममात्र राहीली.केवळ ७३ अंक सेन्सेक्स मधे वाढ राहीली.विदेशी गुंतवणूकदारांक डून होत असलेली विक्री हे या मागच मुख्य कारण आहे. मागील काही महिन्यांपासून रोजच यांच्याकडून विक्री होत आहे. जोपर्यंत युरोपशी एफटीए पूर्ण होत ना ही तोपर्यंत म्हणजेच अजून तीन चार महिने बाजारात थोडीफार अशीच परिस्थिती रहाणार असं दिसतंय. आज रिलायन्स, टाटा स्टील ,बॅक सिमेंट कंपनी, मारूती यांमधे वाढ टिकू राहिल्याने निफ्टीही ३२ अंक वर राहीला आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'सत्राच्या अखेरीस झालेल्या विक्रीमुळे गुंतवणूकदारांच्या सावधगिरीचे प्रतिबिंब 'बाय-ऑन-डिप्स, सेल-ऑन-रॅ लीज' या धोरणावर पडले, ज्यामुळे गुंतवणूकदारांची सावधगिरी अधोरेखित झाली. जीएसटी दर कपातीनंतर मागणी पुनर्प्राप्तीच्या अपेक्षेनुसार ऑटो आणि सहाय्यक शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर जागतिक अनिश्चिततेमध्ये आयटी कमकुवत राहिले. सप्टेंबर म ध्ये फेड दर कपातीची आशा वाढवणाऱ्या अमेरिकेच्या नोकऱ्यांच्या मऊ आकडेवारीनंतर जागतिक स्तरावर भावना सुधारली. तथापि, रशियन तेलावरील निर्बंधांबद्दलच्या नव्या चिंतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आणि व्यापाराशी संबंधित अनिश्चिततेमुळे सुरक्षित-निवासस्थान असलेल्या मालमत्तेची मागणी कायम राहिल्याने सोन्यात वाढ झाली.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'८ सप्टेंबर रोजी झालेल्या घसरत्या व्यापार सत्रात भारतीय शेअर बाजार किंचित वाढले, बेंचमार्क निर्देशांकांमध्ये दिवसाच्या आत अस्थिरतेचे सत्र दिसून आले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील "विशेष संबंध" यावर भाष्य केल्यानंतर जागतिक पातळीवर सुधारलेल्या भावनांमुळे निफ्टी ५० मजबूत स्थितीत उघडला. सुरुवातीच्या व्यापारात निर्देशांकाने जोर पकडला आणि स त्राच्या दुसऱ्या सहामाहीत २४,८८५ चा इंट्राडे उच्चांक गाठला. तथापि, उच्च पातळीवर नफा-वसुलीमुळे वाढीवर मर्यादा आल्याने निर्देशांकाने त्याचे बहुतेक नफा कमी केले आणि अखेरीस २४,७७३.१५ वर स्थिरावला, जो त्या दिवशी ३२ अंकांनी किंवा ०.१३% ने वाढला.
बाजारातील सहभागी आता भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधून येणाऱ्या महागाईच्या छाप्यांकडे लक्ष वेधत आहेत, ज्याचा यूएस फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणाच्या दृष्टिकोनावर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. गेल्या धोरण बैठकीत, फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी २५ बेसिस पॉइंट दर कपातीची शक्यता दर्शविली होती, अमेरिकेतील रोजगार अहवाल अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे जाहीर झाल्यानंतर या दृष्टिकोनाला अधिक चालना मिळाली आहे, ज्यामुळे पुढील आठवड्याच्या FOMC बैठकीपूर्वी अपेक्षा क मी झाल्या आहेत. क्षेत्रीय आघाडीवर, कामगिरी मिश्रित होती. निफ्टी ऑटो सर्वाधिक वाढणारा म्हणून उदयास आला, मजबूत क्षेत्रीय गतीच्या पार्श्वभूमीवर ३.३% वाढला. निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी मेटल निर्देशांक देखील हिरव्या रंगात बंद झाले, अनुक्रमे ०.५% आणि ०.३७% वाढले. उलट, बचावात्मक क्षेत्रांवर दबाव आला, निफ्टी आयटी ०.९४% घसरला, निफ्टी फार्मा ०.२७% घसरला आणि निफ्टी एफएमसीजी ०.२१% घसरला.'
आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'निर्देशांकाने एका लहान अस्वलाच्या कँडलची (Bear Candle) निर्मिती केली ज्याचा वरचा भाग स्टॉक-विशिष्ट हालचाली दरम्यान चालू असलेल्या एकत्रीक रणाचा (Consolidation) संकेत देत होता. निर्देशांक त्याच्या श्रेणी-बाउंड हालचाली वाढवण्याची शक्यता आहे, गेल्या दोन आठवड्यांपासून दिसून आलेल्या एकत्रीकरण टप्प्याला वाढवते. नजीकच्या काळात विस्तृत व्यापार श्रेणी २४४०० आणि २५००० पातळी दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. शुक्रवारी २४६२० पातळीच्या नीचांकी पातळीवर तात्काळ आधार ओळखला जातो. जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या वर राहील तोपर्यंत २५००० पातळीच्या चिन्हाकडे परत येण्याची शक्यता आहे. तथापि, २४६२० पातळीच्या खा ली ब्रेक आणखी घसरणीला कारणीभूत ठरू शकतो, निर्देशांक २४४००-२४३०० पातळीच्या महत्त्वपूर्ण समर्थन क्षेत्राकडे ओढला जाऊ शकतो. २४४००-२४३०० चे प्रमुख समर्थन क्षेत्र (Support Zone) म्हणजे अलिकडच्या स्विंग नीचांकी आणि २००-दिवसांच्या ईएमए (Exponential Moving Average EMA) चे संगम (Integration) आहे, ज्यामुळे ते निरीक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचे स्तर बनते. एकूणच, निर्देशांक स्टॉक-विशिष्ट हालचालींवर लक्ष केंद्रित करून एकत्रीकरण टप्प्यात राहण्याची शक्यता आहे.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीतील पोझिशनवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'बँक निफ्टीने एक उच्च लाट मेणबत्ती (High Wave Candle) तयार केली आहे ज्यामध्ये एक लहान वास्तविक शरीर आहे आणि दोन्ही दिशेने सावल्या आहेत ज्यामुळे इंट्राडे अस्थिरता दिसून येते. निर्देशांक २००-दिवसांच्या ईएमए (EMA) भोवती फिरत राहतो, जो एक प्रमुख झोन म्हणून काम करत आहे. नजीकच्या काळात, निर्देशांक ५३५०० आणि ५५००० पातळी दरम्यान श्रेणीबद्ध राहण्याची अपेक्षा आहे, जे कोणत्याही दिशात्मक ब्रेकआउटपूर्वी एकत्रीकरण टप्प्याचे संकेत देते. वरच्या बाजूस, ५४८००-५५००० झोन हा एक महत्त्वाचा पुरवठा झोन (Support Zone) आहे, जो पूर्वीच्या ब्रेकडाउन क्षेत्राच्या आणि १००-दिवसांच्या ईएमए (EMA) च्या संगमाने चि न्हांकित आहे.हा प्रदेश एक मजबूत ओव्हरहेड प्रतिरोध म्हणून काम करण्याची शक्यता आहे. नकारात्मक बाजूने, तात्काळ आधार ५३५००-५३३०० पातळीवर ठेवला आहे, जो २००-दिवसांच्या ईएमए (EMA) आणि मे २०२५ च्या स्विंगलो (Swing Low) शी जुळतो.
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'गेल्या आठवड्यातील कमकुवत बिगर-शेती वेतन डेटामुळे आगामी बैठकीत फेडकडून दर कपातीची अपेक्षा बळ कट झाल्यानंतर, सोन्याने सकारात्मक संकेत दिले. COMEX वर $3615 वर $28 आणि MCX वर १०८००० वर ३०० रूपयाने वाढ झाली. दर कपातीच्या अपेक्षांसह टॅरिफ अनिश्चितता सोन्याला मजबूत आधार देत आहेत. या आठवड्यात, यूएस सी पीआय (CPI) आणि कोअर सीपीआय (CPI) डेटा ट्रेंड आणि अस्थिरतेचे मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. सोन्यासाठी प्रमुख आधार $3560 / १०६५०० रुपयांवर दिसून येत आहे, तर प्रतिकार $3650 / १०९५०० रूपयांवर आहे.'
त्यामुळे आजच्या बाजारात मर्यादित वाढ झाली असली तरी उद्याच्या सत्रातही सपोर्ट लेवल कायम राहण्याची शक्यता आहे.आजप्रमाणेच उद्यादेखील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भूमिका बाजारात निर्णायक असली तरी घरगुती गुंतवणूकदारांकडूनही वा ढीव गुंतवणूकीची अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी गुंतवणूकदारांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.