उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाला मोठी आग, धुराचे प्रचंड लोट

उरण: उरणमधील महत्वपूर्ण आणि अति संवेदनशील ओनजीसी प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून, आगीचे आणि धुराचे लोट सर्वत्र पसरलेले दिसून येत आहे.  बातमी समजताच, तात्काळ  सीआयएसएफ आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.  आग मोठ्या प्रमाणात लागली असल्याकारणामुळे, आगीचे लोळ पाहून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


सध्या ही आग विझविण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अग्निशमन दलाची पूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.  या प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे. याच प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेलाचे वितरणही केले जाते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात विलंब लागला तर ही आग आणखी रौद्ररुप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही आग तात्काळ विजवणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हंटले जात आहे.


याच प्रकल्पाला काही वर्षापूर्वी अशाच प्रकारे भीषण आग लागली होती. दिनांक ३ सप्टेंबर २०१९ रोजी उरण ओएनजीसीला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आजची घटना सहा वर्षापूर्वीच्या त्या घटनेची आठवण करून देत आहे.



 
Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

DRDO Military Combat Parachute System test : लडाखमध्ये २२,००० फूट उंचीवरून स्वदेशी लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने लडाखमधील जगातील सर्वात उंच ड्रॉप झोनपैकी एकावर आपल्या लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची