
मोहित सोमण: आजपासून कृपालु मेटल्स लिमिटेड व निलाचल कार्बो मेटालिक्स लिमिटेड हे दोन एसएमई आयपीओ (SME IPO) बाजारात दाखल होत आहेत. जाणून घेऊयात याविषयी सविस्तर माहिती
१) Krupalu Metals Limited - या कंपनीचा १३.४८ कोटींचा आयपीओ आज ८ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या कालावधीत बाजारात दाखल झाला आहे. १२ सप्टेंबरला आयपीओची निश्चिती होणार असून १६ सप्टेंबरला कंपनी बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. बीएसई एसएमई अंतर्गत आयपीओ सूचीबद्ध होईल. कंपनीने प्राईज बँड ७२ रूपये प्रति शेअर निश्चित केला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना आयपीओसाठी किमान २३०४०० रूपयांची (३२०० शेअर्स) गुंतवणूक करणे अनिवार्य असणार आहे.
Finshore Management Services Limited कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Cameo Corporate Services Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. मार्केट मेकर म्हणून Anant Se curities Limited कंपनी काम पाहणार आहे. १० रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या १७७७६०० शेअर गुंतवणूकदारांसाठी आयपीओत विक्रीसाठी उपलब्ध असतील. तर एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी मार्केट मेकरसाठी ५.०४% वाटा गुंत वणूकीसाठी उपलब्ध असेल तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institutional Investors NII) यांच्यासाठी ४७.४४% वाटा उपलब्ध असेल. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) ४७.५२% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल.
जगदीश कटारिया, नवीनभाई कटारिया हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल १००% होते ते आयपीओनंतर घसरत ६८.१२% वर येणार आहे. २०१२ साली या कंपनीची स्थापना झाली होती. कंपनी ब्रास व तांबे उत्पादनात सक्रीय आहे याखेरीज कंपनी पाईप फिटिंग, टर्मिनल, बस बार व तत्सम मेटल उत्पादनात कार्यरत आहे.उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ३१% वाढ झाली होती. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात इ यर ऑन इयर बेसिसवर ३९% वाढ झाली होती. कंपनीच्या आर्थिक उत्पन्नात मार्च २०२४ मधील ३७.१२ कोटींच्या तुलनेत मार्च २०२५ मध्ये ४८.५० कोटींवर वाढ नोंदवली होती. कंपनीच्या ईबीटा (EBITDA) ३१ मार्च २०२४ मधील २.५७ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ३.७० कोटींची वाढ नोंदवली आहे. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४२.४८ कोटी रुपये आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी भांडवली खर्चासाठी, खेळत्या भांडवल गरजेसाठी (Working Capital Requirements), विशिष्ट खर्चासाठी व इतर दैनंदिन खर्चासाठी करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
पहिल्या दिवशी कंपनीला किती सबस्क्रिप्शन मिळाले?
पहिल्या दिवशी आयपीओला सकाळी ११ वाजेपर्यंत एकूण ०.०४ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून (Retail Investors) ०.०७ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे. तर अद्याप परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Qualified In stitutional Buyers QIB) यांच्याकडून व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) कडून कंपनीला कुठलेही सबस्क्रिप्शन मिळाले नाही.
२) Nilachal Metalicks Limited - निलाचल कार्बो मेटालिक्स लिमिटेड कंपनीचा ५६ कोटींचा आयपीओ आज ८ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर पर्यंत बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल होत आहे. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) १२ सप्टें बरला होऊ शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,आयपीओत ०.२६ कोटी शेअर्सचा फ्रेश इशू असणार आहे. म्हणजेच फ्रेश इशूसाठी २२.१० कोटी मूल्यांकनाचे शेअर उपलब्ध असतील तर ऑफर फॉर सेल ( OFS) साठी ०.४० कोटी शेअर म्हणजेच ३४ कोटी मूल्यांकनाचे शेअर उपलब्ध असतील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आयपीओसाठी ८५ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केला आहे. १६ सप्टेंबरला बीएसई एसएमई अंतर्गत आयपीओ सूचीबद्ध (Listed) होणार आहे.
या आयपीओत गुंतवणूकीसाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान २७२००० रूपयांची गुंतवणूक (३२०० शेअर) करावी लागेल. Sun Capital Advisory Services Limited कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून करणार आहे तर Kfin Techno logies Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. मार्केट मेकर म्हणून NNM Securities Limited कंपनी आयपीओसाठी काम करणार आहे.
एकूण ६६ लाख शेअर्सचा हा इशू असणार आहे. त्यापैकी १९.२८ कोटीचे शेअर फ्रेश इशूसाठी असतील. तर ऑफर फॉर सेल साठी ३४ कोटींचे शेअर उपलब्ध असतील. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी मार्केट मेकरसाठी ५.०२% वाटा गुंतवणूकीसाठी उ पलब्ध असेल. तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ४७.४७%, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ४७.५२% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. १५ सप्टेंबरला कंपनी बाजारात सूचीबद्ध होईल. बिभू पांडा, काजल फॅशनवेअर एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड हे दोन कंपनीचे प्रवर्तक आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ९९.९९% होते ते आयपीओनंतर घसरत ७३.५२% वर जाणार आहे. २००३ साली या कंपनीची स्थापना झाली होती. कंपनी प्रामुख्याने मेटल व संबंधित उत्पादनात कार्यरत आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर २४% घसरण झाली होती. तर इयर बेसिसवर कंपनीच्या करोत्तर नफ्यातही ११% घसरण झाली होती. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या एकूण उत्पन्नात (Income) मध्ये मार्च २०२४ मधील २६७.१३ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत २०२.७९ कोटींवर घसरण झाली. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्ये मार्च २०२४ मधील १५.८२ कोटींच्या तुलनेत या मार्च २५ मध्ये १४.०२ कोटींवर घसरण झाली. कंपनीच्या ईबीटा (EBITDA करपूर्व कमाई) मार्च २४ मधील २२.३२ कोटींच्या तुलनेत मार्च २५ मध्ये २७.१३ कोटींवर वाढ झाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल २११.८८ कोटी रुपये आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर भांडवली खर्चासाठी, प्रकल्पाची डागडुजी करण्यासाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
आतापर्यंत किती सबस्क्रिप्शन मिळाले?
कंपनीला सकाळी ११ वाजेपर्यंत एकूण ०.१९ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून ०.०४ वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.४८ वेळा तर अजून पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून कुठलेही सबस्क्रिप्शन मिळाले नाही.