Monday, September 8, 2025

आज Auto Metal Stocks जोरदार, टाटा स्टील नव्या उच्चांकावर काय कारणे आहेत जाणून घ्या एका क्लिकवर

आज Auto Metal Stocks जोरदार, टाटा स्टील नव्या उच्चांकावर काय कारणे आहेत जाणून घ्या एका क्लिकवर

मोहित सोमण:आज शेअर बाजारात ऑटोमोबाईल व मेटल क्षेत्राने मोठी रॅली केली आहे. जीएसटी कपातीमुळे या क्षेत्रात नवी चालना मिळाल्याने आज शेअर बाजाराने या क्षेत्रीय निर्देशांकांना मोठा प्रतिसाद दिला आहे. दुपारपर्यंत निफ्टी ऑटो (३.२५%) व बीएस ई ऑटो (३.०९%) निर्देशांकात वाढ झाली आहे. निफ्टी मेटल निर्देशांकात १.०३% वाढ झाली असून सेन्सेक्स मेटल निर्देशांकात ०.९६% वाढ झाली आहे.जीएसटी काऊन्सिल निर्णयाचा सर्वाधिक फायदा ऑटोमोबाईल क्षेत्रात झाला होता. त्यामुळे सात ते आठ ला खांने गाड्यांच्या किंमती कमी होत असल्याने ग्राहकांची खरेदीत मोठी वाढ होत आहे. उपभोगात (Consumption) पँटर्न बदलत असल्याने आगामी काळात गाड्यांच्या मागणीत व विक्रीत मोठी वाढ अपेक्षित आहे. यापूर्वीही फाडा (Federation of Automob ile Dealers Association FADA) ऑगस्टच्या आकडेवारीनुसार, रिटेल विक्रीत २.८४% वाढ इयर ऑन इयर बेसिसवर झाली आहे. तर दुचाकी विक्रीत इयर बेसिसवर २.१८% झाली होती. मुख्यतः बँक ऑफ अमेरिका (BofA) कडून ऑटो समभागात टार्गेट प्रा ईज (लक्ष्य किंमत) वाढल्याने गुंतवणूकदारांच्या भावनात बदल झाले आणि आणखी रॅली बाजारात झाली. ज्यामध्ये सर्वाधिक फायदा भारत फोर्ज, अशोक लेलँड समभागसह टाटा मोटर्स शेअरला झाला आहे. अशोक लेलँड व भारत फोर्ज समभाग (Stocks) सका ळच्या सत्रात ४% उसळले होते. दुपारी १.३० वाजेपर्यंत अशोक लेलँड शेअर ४.८८% उसळला होता. तर भारत फोर्ज समभाग दुपारी १.३० वाजेपर्यंत ६.२६% उसळला आहे. दुपारी १.३० वाजेपर्यंत टाटा मोटर्स शेअर ३.८०% उसळला होता. याशिवाय बजाज ऑ टो (३.१४%), महिंद्रा अँड महिंद्रा (३.९३%), हिरो मोटोकॉर्प (२.७३%), टीव्हीएस मोटर्स (३.२३%) समभागात वाढ झाली आहे.

यापूर्वी एम अँड एमने म्हटले होते की ते त्यांच्या आयसीई एसयूव्ही लाइनअपमध्ये जीएसटी २.० फायदे ताबडतोब ग्राहकांना देतील.थार, स्कॉर्पिओ, बोलेरो आणि एक्सयूव् ही७०० सारख्या मॉडेल्समध्ये आता व्हेरिएंटनुसार १.०१ लाख ते १.५६ लाख रुपयांपर्यंत बच त होऊ शकते. बोफाने एम अँड एमसाठीची लक्ष्य किंमत (Target Price TP) ३७५० रुपयांवरून ४००० रुपये प्रति शेअरवर वाढवली आहे ज्यामुळे त्यांचे 'बाय' रेटिंग कायम राहिले आहे. हे मागील ३५६१.३० रुपयांच्या बंदपेक्षा १२% अधिक वाढीची शक्यता द र्शवते.दुचाकी विक्रीसाठी BofA ने 'तटस्थ' भूमिका (Neutral Stance) कायम ठेवत दुचाकी उत्पादकांसाठी लक्ष्य किमती वाढवल्या आहेत. ब्रोकरेज नोटनुसार, बजाज ऑटोचे लक्ष्य ९६०० रुपये, टीव्हीएस मोटरचे ३७२५ रुपये आणि हिरो मोटोकॉर्पचे ५६५० रु पये प्रति शेअर केले आहे. टाटा मोटर्सनेही आपल्या प्रवासी गाड्यांच्या किंमतीत १.५५ लाखांपर्यंत सूट व व्यवसायिक वाहनांवर ४.६५ लाखांपर्यंत सूट देण्याचे ठरवले आहे. होंडाई मोटर्सने आपल्य i20 गाडीवर २.४० लाखांपर्यंत सूट देण्याचे सांगितले होते. याखेरी ज Creta, Alcazar, Tucson या गाड्यांवरही सूट देण्याचे सांगितले होते. त्यामुळे जवळपास सगळ्याच महत्वाच्या व हेवी वेट ऑटो शेअरमध्ये वाढ झाली आहे.बँक ऑफ अमेरिका (BofA) ने त्यांच्या नोंदीत लिहिले आहे की, ऑटो क्षेत्र अपसायकलसाठी चांगल्या स्थितीत आहे, ज्याला मालकीचा कमी खर्च, सुलभ कर्ज आणि कच्च्या मालाच्या किमतीत स्थिरता यासारख्या चालकांचा पाठिंबा आहे.

BofA ने FY25-28 मध्ये गाड्यांच्या ८% CAGR ने व्हॉल्यूम वाढ अपेक्षित केली आहे जी 0.8x नाममात्र GDP वाढीच्या (Nominal GDP growth) अनुषंगाने केलेली आहे. आपल्या अभ्यासात त्यांनी म्हटले आहे की दुचाकी अपग्रेड बाजारपेठेत उच्च घरगुती प्र वेश, वाढत्या वित्तपुरवठा पर्याय आणि वाढत्या ग्राहकांच्या आकांक्षेचा पाठिंबा आहे. आयशर आणि टीव्हीएस यांना सायकल आणि ग्रामीण मागणी दोन्हीचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात ऑटो शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना मोठा फा यदा मिळाला.

मेटल शेअर्समध्ये मोठी रॅली का?

सरकारने स्टील उत्पादनाला प्रोत्साहन व शाश्वत वाढीसाठी (Sustainable Growth) देण्यासाठी ५००० कोटींची नॅशनल मिशन योजना जाहीर केली आहे. याशिवाय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनकडून स्टील उत्पादनात घट होणार असल्याने भारतीय औद्योगिक कंपन्यांना उत्पादनाला आणखी चालना मिळू शकते. सकाळी सत्र सुरूवातीलाच बीएसई मेटल निर्देशांकात १.०२% वाढ झाली होती. व एनएसईत ०.३०% वाढ झाली होती. दुपारी १.३० वाजेपर्यंत एनएसई मेटल निर्देशांकात १.०३% वाढ झाली असून बी एसईत मेटल निर्देशांकात ०.९३% वाढ झाली आहे. सकाळी बीएसई मेटल निर्देशांकात ६% वाढ झाली होती. सकाळीच टाटा स्टील समभागात मोठी वाढ झाली. टाटा स्टील २ ते ३% सत्र सुरूवातीला उसळल्याने कंपनीचा शेअर ५२ आठवड्यातील उच्चांकावर ( All time High) वर पोहोचला आहे. दुपारी १.३० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १.७७% वाढ झाली आहे. दुपारी १.३० वाजेपर्यंत जेएसडब्लू स्टील (३.१७%), जिंदाल स्टील (१.०३%), सेल (१.८५%), अपोलो ट्युब लिमिटेड (१.१३%), सारडा एनर्जी अँड मिनरल (१.१३%) समभागात वाढ झाली आहे. त्यामुळे मेटल समभागातही आज रॅली झाली.

प्रामुख्याने भारत सरकार स्टील क्षेत्राचे कार्बनीकरण (Decarbonisation) कमी करण्यासाठी एका राष्ट्रीय मोहिमेद्वारे एक मोठे धोरणात्मक पाऊल उचलण्याची योजना आखत आहे. सरकारच्या या ५००० कोटी रुपयांच्या योजनेतून प्राथमिक आणि दुय्यम स्टील उत्पादकांना सवलतीच्या दरात कर्जे आणि जोखीम हमी यासारखे आर्थिक प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे कंपनीच्या उत्पादनात चालना मिळेलच परंतु कंपनीची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. या क्षेत्राला पाठिंबा देणाऱ्या  भारत सरकारने एप्रिल २ ०२५ मध्ये २०० दिवसांसाठी फ्लॅट स्टील आयातीवर १२ टक्के तात्पुरती सुरक्षा शुल्क लादले. स्वस्त आयात आणि डंपिंगच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा उपाय सादर करण्यात आला, ज्यामुळे देशांतर्गत स्टीलच्या किमती तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आल्या होत्या, ज्यामुळे संपूर्ण उद्योगाच्या नफ्यावर परिणाम झाला होता. ज्याचा फायदा क्षेत्राला Anti Dumping क्रियेतून होत आहे. त्यामुळे मेटल कंपन्यांच्या मार्जिनमध्ये सु़धारणा अपेक्षित आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >