Saturday, October 25, 2025
Happy Diwali

बीडमधील समाजिक समतेविषयी काय म्हणाले धनंजय मुंडे ?

बीडमधील समाजिक समतेविषयी काय म्हणाले धनंजय मुंडे ?

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे राजकारणात पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांनी बीड जिल्ह्यातील सामाजिक समतेविषयी केलेले ताजे वक्तव्य चर्चेत आहे. बीड जिल्ह्यात काम करणाऱ्या पोलिसाला आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का, असा सवाल आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी वारंवार टीका केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड हा सूत्रधार असल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराड आणि त्याचे काही सहकारी तुरुंगात आहेत. या घटनाक्रमात धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप झाले होते. मुंडे यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. प्रकृतीच्या कारणास्तव मुंडे हे काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. पण आता आमदार धनंजय मुंडे राजकारणात पुन्हा सक्रीय झाले आहेत.

बीड येथे आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात धनजंय मुंडे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी बीड जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावात प्रत्येकाला अनुभव आला असेल. प्रत्येकाने आपआपलेच महामानव बांधून घेतलेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा समाजाने साजरी करायची का ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनी साजरी करायची का ? महात्मा फुले यांची जयंती फक्त माळी समाजाने साजरी करायची का? शिक्षणाची चळवळ महात्मा फुले यांनी सुरू केली म्हणून फक्त माळी समाजातील लोकांनी शिक्षण घ्यायचे का? भगवान बाबांची जयंती फक्त वंजारी समाजाने साजरी करायची का ? असा सवाल केला. धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांना स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का ? सर्वांनीच सर्व समाजातील लोकांनी पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >