
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भस्करच्या सोशल मिडियावरील एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे. ज्यात ती पती फहादसोबत एका सार्वजनिक गणपती मंडळातील गणरायाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेली दिसून येते. तिच्या या व्हिडिओला अनेकांकडून चांगला प्रतिसाद आला आहे, पण त्याबरोबरच काहीनी नाराजीदेखील व्यक्त केली आहे.
काल शनिवारी, अनंत चतुर्दशीला प्रत्येकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे जड अंतःकरणाने निरोप घेतला. गणेशोत्सवाचे दहा दिवस कसे संपले हे कोणालाच कळले नाही! या १० दिवसांमध्ये केवळ सर्व सामान्य लोकांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील वेगवेगळ्या गणपती मंडळात जावून दर्शन आणि आशीर्वाद घेतळे. अभिनेत्री स्वरा भास्कर देखील पती फहाद अहमद आणि लेक राबिया हिच्यासोबत गणपती मंडळात पोहोचली होती. ज्याचा एक व्हिडीओ स्वराने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मात्र, सध्या तो ट्रोलर्सच्या रडारवर आहे.
व्हिडिओ का होत आहे ट्रोल?
View this post on Instagram
स्वरा ही हिंदु आहे पण तिचा पती फहाद अहमद हे मुस्लिमधर्मीय असल्याकारणामुळे, या दोघांना नेहमीप्रमाणे यावेळी देखील ट्रोल करण्यात येत आहे. यावेळी स्वराने फहादसोबत अनुशक्ती नगरच्या अनेक मंडळांना भेट दिली आणि बाप्पाचे आशीर्वाद घेतले. यादरम्यान स्वरा हिरव्या साडीत दिसून आली. तिच्यासोबत तिचा पती आणि मुलगी देखील होती. तिघांनी गणपती मंडळात जाऊन दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यादरम्यान, या जोडप्याने बाप्पाच्या मूर्तीची पूजा करत, प्रसाद देखील अर्पण केला. हा व्हिडिओ शेअर करताना स्वराने लिहिलं, ‘गणपती बाप्पा मोरिया, पुढच्या वर्षी लवकर या….'
धर्मावरून करण्यात आलं ट्रोल
स्वरा भास्कर आणि फहाद अहमद याच्या व्हिडीओवर अनेकांनी प्रेम व्यक्त केलं. तर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे. मुळात फहाद राजकारणात सक्रिय असून, ते राष्ट्रवादी कोंग्रेसचे नेतेदेखील आहेत. त्यामुळे त्यांचा अनेक सामाजिक कार्यक्रमात आणि उत्सवात हिरीरीने सहभाग असतो. त्यानुसार गणेशोत्सवाच्या निमित्ताने फहाद यांनी आपल्या कुटुंबीयासोबत काही गणपती मंडळांना भेट दिली. यादरम्यान, त्यांना गणपतीची पूजा केल्याबद्दल काही कट्टरपंथी मुस्लिमांनी ट्रोल केले. त्यापैकी एक म्हणाला ‘फहाद याला सांगा इस्लाममध्ये मुर्तीची पूजा करणं हराम आहे’, तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘मुसलमान नावावर कलंक आहे…’