Sunday, September 7, 2025

मुंबईतील दहिसर पूर्व येथे इमारतीत भीषण आग : वृद्ध महिलेचा मृत्यू , अनेक जखमी

मुंबईतील दहिसर पूर्व येथे इमारतीत भीषण आग : वृद्ध महिलेचा मृत्यू , अनेक जखमी

मुंबई : दहिसर पूर्व येथील जनकल्याण एस.आर.ए. इमारतीच्या सातव्या मजल्यावर अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे . आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे .

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी परिसर सील केला .

या दुर्घटनेत एका ८० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर तिघे जण या आगीत जखमी झाले असून त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. आगीत एक १२ वर्षांची मुलगी देखील गंभीररीत्या भाजली आहे तिच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे . त्यांना प्राथमिक वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे.

आगीचे कारण ?

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची तीव्रता इतकी होती की काही क्षणांतच धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले. त्यामुळे शेजारच्या इमारतीतील रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते .

Comments
Add Comment