आनंदाची बातमी, रशियाने विकसित केली कॅन्सरला हरवणारी लस


मॉस्को : कर्करोग म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हा आजार झाला की रुग्ण आणि त्याचे नातलग निराश होतात. हे नैराश्यच अनेकदा रुग्णाच्या मृत्यूचे मुख्य कारण असते, असे डॉक्टर सांगतात. कारण कॅन्सरवर केमो थेरपी आणि इतर औषधांनी उपचार करतेवेळी शरीरावर अनेक साईड इफेक्ट अर्थात प्रतिकूल परिणाम होतात. या त्रासातून बरे होण्यास अनेकदा काही आठवडे किंवा काही महिन्यांचा कालावधी लागतो. तोपर्यंतचा कालावधी हा अनेकदा जीवघेणा असतो. हा त्रासच रुग्ण आणि त्याच्या नातलगांना जास्त निराश करतो. पण या समस्येवर उपाय सापडला आहे. रशियात झालेल्या संशोधनामुळे नवी आशा निर्माण झाली आहे.


रशियाने कर्करोगाला प्रतिबंध करणारी लस अर्थात कॅन्सरला प्रतिबंध करणारी लस विकसित केल्याचे जाहीर केले आहे. या लसचे रुग्णांवरील प्रयोग सुरू आहेत. प्रीक्लिनिकल ट्रायल यशस्वी झाली असून पुढील टप्प्याचे प्रयोग सुरू आहेत. आतापर्यंतच्या प्रयोगांमध्ये ट्युमरचा आकार ६० ते ८० टक्क्यांनी कमी करण्यात लस यशस्वी झाली आहे. यामुळे इतर औषधांच्या मदतीने रुग्णाला बरे करणे शक्य होत आहे.


रशियाची लस mRNA तंत्राद्वारे विकसित केली आहे. यात प्रत्येक रुग्णाच्या शरीरातून आधी RNA अर्थात रिबोन्यूक्लिक आम्ल घेतले जाते. या रिबोन्यूक्लिक आम्लाच्या मदतीने संबंधित रुग्णासाठी लस विकसित केली जाते. यामुळे संबंधित रुग्णाच्या शरीरात पसरत असलेल्या कॅन्सरला प्रतिबंध करणारी लस विकसित करणे सोपे होते. लस कमालीची प्रभावी ठरते. कोलोन कॅन्सर, ब्रेन कॅन्सर ग्लियोब्लास्टोमा, स्किन कॅन्सर मेलेनोमा या आजारांवर रशियाची लस प्रभावी असल्याचे आढळले आहे. सध्या या लसची किंमत तीन लाख रुबल म्हणजेच अडीच लाख रुपये एवढी आहे. रशिया सरकार कॅन्सर रुग्णांना लस विनामूल्य देण्याबाबत विचार करत आहे.


कॅन्सरला हरवणाऱ्या रशियाच्या लसचे पहिल्या टप्प्याचे ह्युमन ट्रायल सप्टेंबर - ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे. या प्रयोगाकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष आहे.


Comments
Add Comment

परदेशातही गणेशोत्सव उत्साहात

बाप्पाचा जयघोष आणि गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी भूमीवर भारतीय संस्कृतीचे दर्शन क्वालालंपूर: भारतातील

डोनाल्ड ट्रम्प यांना २४ तासात उपरती; म्हणाले, मोदी उत्कृष्ट आणि महान पंतप्रधान

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आपली

इम्रान खान यांच्या बहिणीवर फेकली अंडी!

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहिणीवर अंडी फेकण्यात आल्याची

नेपाळमध्ये फेसबुक आणि यूट्यूबसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी

काठमांडू : नेपाळमध्ये फेसबुक,व्हॉट्सअॅप आणि एक्ससह २६ सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

Afghanistan Earthquake: २२०० जणांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये भूकंप, अन्न आणि औषधांचा प्रचंड तुटवडा

काबूल: जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसच्या मते, गुरुवारी आग्नेय अफगाणिस्तानला ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप आला.

"पंतप्रधान मोदी खूपच हुशार" अमेरिकन गृह विभागाच्या माजी अधिकाऱ्याने ट्रम्प यांना भारताची माफी मागण्याचे केले आवाहन

टॅरिफ शून्य करून भारताची माफी मागण्याचे एडवर्ड प्राइस यांनी डोनाल्ड ट्रम्पना केले आवाहन वॉशिंग्टन: