
अबुधाबी : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धा मंगळवार ९ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग या सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना बुधवार १० सप्टेंबर रोजी आहे. संयुक्त अरब आमिराती अर्थात यूएई विरुद्ध भारताचा पहिला सामना होणार आहे. आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार आहेत.
आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेतील भारताचे साखळी सामने
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार)
- बुधवार १० सप्टेंबर २०२५ - भारत वि. यूएई - दुबई
- रविवार १४ सप्टेंबर २०२५ - भारत वि. पाकिस्तान - दुबई
- शुक्रवार १९ सप्टेंबर २०२५ - भारत वि. ओमान - अबुधाबी
आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग