Saturday, September 6, 2025

Pune Crime: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं समोर

Pune Crime: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं समोर
पुणे: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत आयुष (गोविंदा) गणेश कोमकर (Govinda Komkar) या तरूनवर गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. आयुष कोमकर क्लासवरुन परत येताच त्याच्यावर हल्लेखोराकडून गोळ्या झाडल्या गेल्या, ज्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी पुणे पोलिस अॅक्शन मोड वर आहेत. याबद्दल अधिकृत माहिती अशी की, रात्री पावणेआठच्या सुमाराला आयुष कोमकर या युवकाची क्लासमधून परत आल्यावर अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केल्याची माहिती गुन्हे शाखा उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे. आयुष कोमकरवर गोळ्या झाडल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. गणेश कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी होता. तो वनराज आंदेकरचा भाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या सहा टीम रवाना करण्यात आल्या आहेत. याबाबत काही सुगावे लागल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा