
मुंबई : मराठा समाजास आरक्षण मिळण्याकरीता ज्यांनी आत्महत्या केली किंवा आंदोलना दरम्यान ज्यांचा मृत्यू झाला. अशा मयत कुटुंबीयांच्या (कायदेशीर वारसांना) परिवाराला मुख्यमंत्री साह्ययता निधीमधून १० लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
आंदोलना दरम्यान ७ मराठा तरुणांचा मृत्यू झाला होता. एकूण ७० लाख रुपये रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्यात येत आहेत.