मुंबई: आज पहाटेपासूनच लालबागचा राजा, मुंबईचा राजा तसेच मुंबईतील इतर प्रतिष्ठित मंडळामध्ये गणेश विसर्जनाच्या लगबगीला सुरुवात झाली आहे. हे सर्व गणपती एका मागून एक मुंबईच्या रस्त्यावर दाखल होणार असल्याकारणामुळे त्यांच्या भाव्य मिरवणुकीत सामील होण्यासाठी मुंबईकर देखील सज्ज झाली आहेत.
११ दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाच्या समारोपासह मुंबईतील बाप्पांना आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात येणार आहे. लालबाग परळ येथील प्रसिद्ध गणेश मंडळांनी आपापल्या बाप्पाच्या निरोपाच्या तयारीला सुरुवात केली असून, लालबागचा राजाच्या मंडळातील कार्यकर्ते राजाच्या मार्गावरील रस्त्याची पाणी टाकून स्वच्छता करता दिसून येत आहे. तर गणेश गल्ली सार्वजनिक मंडळातील मुंबईचा राजाची मिरवणूक सगळ्यांच्या आधी म्हणजे सकाळी ८ वाजता निघणार असल्याचे म्हंटले जात आहे.
कोणत्या वेळी कोणत्या मंडळाच्या गणपतीची मिरवणूक निघणार? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
मुंबईचा राजा, गणेश गल्ली, लालबाग
मार्ग- गणेश गल्ली- चिंचपोकळी पूल- बकरी अड्डा- सात रस्ता- लॅमिंग्टन रोड- गिरगाव चौपाटी
वेळ - सकाळी ८ वाजता
लालबागमधील सर्वात जुने गणेशोत्सव मंडळापैकी एका असलेल्या, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ हे प्रमुख मंडळांमध्ये विसर्जन प्रक्रिया पूर्ण करणारे पहिले मंडळ होण्याची त्यांची परंपरा यावर्षी देखील कायम ठेवणार आहे. त्यानुसार मुंबईच्या राजाची अंतिम आरती सकाळी ८ वाजता सुरू होईल, त्यानंतर २२ फूट उंचीची गणेश मूर्ती गणेश गल्लीच्या प्रवेशद्वारावर भव्य निरोपासाठी नेली जाईल. दुपारी १२.३० वाजता, बाप्पाचे दरवर्षीप्रमाणे प्रतिष्ठित पुष्पवर्षाने स्वागत केले जाईल, त्यानंतर एक भव्य रंगोत्सव आयोजित करून, बाप्पावर 'भगवा गुलाला'ची उधळण करत मिरवणूक काढली जाणार आहे.
चिंचपोकळीचा चिंतामणी
मार्ग- चिंतामणी गल्ली- लालबाग- चिंचपोकळी पूल- सात रस्ता- चर्नी रोड- गिरगाव चौपाटी
वेळ - सकाळी १० वाजता
शिस्तबद्ध विसर्जन यात्रेसाठी प्रसिद्ध असलेले मंडळ चिंचपोकळीचा चिंतामणी यावर्षी देखील बाप्पाळा विनम्र निरोप देण्याची आपली परंपरा पाळेल. याची अंतिम आरती सकाळी ९ वाजता सुरू होईल आणि विसर्जन मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू होईल. चिंतामणीची मिरवणूक चिंचपोकळी पूल, सात रस्ता, मुंबई सेंट्रल आणि चर्नी रोड मार्गे गिरगाव चौपाटीकडे निघेल. चिंचपोकळीचा चिंतामणी मूर्तीचे शनिवारी रात्री उशिरा विसर्जन केले जाईल.
लालबागचा राजा
मार्ग- लालबाग मार्केट- लालबाग फ्लायओव्हर- भारत माता सिनेमा- चिंचपोकळी रेल्वे स्टेशन- भायखळा रेल्वे स्टेशन- चर्नी रोड रेल्वे स्टेशन- गिरगाव चौपाटी
वेळ - सकाळी १० वाजता
लालबागचा राजा हा निःसंशयपणे मुंबई शहरातील सर्वात जास्त गर्दी खेचणारे आणि दर्शन घेतले जाणारे गणेशोत्सव मंडळ आहे आणि त्याचप्रमाणे हजारो भाविक त्याच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. दरवर्षीप्रमाणे, यंदा ही लालबागच्या राजाची मूर्ती एका शाही पालखीवर बसवली जाईल आणि दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरून गिरगाव चौपाटीपर्यंत सुमारे १० किमी अंतर कापून जाईल. अलिकडच्या काळात पाहिल्या जाणाऱ्या ट्रेंडप्रमाणे, रविवारी सकाळी मूर्तीचे विसर्जन केले जाईल.
गिरगावचा राजा
मार्ग- निकटवारी लेन- खाडिलकर रोड- सीपी टँक- जगन्नाथ शंकर सेठ रोड- एसव्हीपी रोड- गिरगाव चौपाटी
वेळ - सकाळी १० वाजता
गिरगावचा राजाच्या भव्य विसर्जन मिरवणुकींत मुंबई पुन्हा दुमदुमणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून गिरगावचा राजाच्या मिरवणुकीत पुणेरी ढोल आणि बॅन्जोसह बाप्पाला निरोप दिला जातो. दरवर्षी सुमारे १०,००० लोक विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर कलाकुसर सादर करतात. सुरुवातीला लहान मूर्ती सकाळी ८.३० वाजता गिरगावच्या रस्त्यांवरून नेली जाईल, त्यानंतर २५ फूट उंच असलेली गणेश मूर्ती सकाळी १० वाजता तिच्या जागेवरून निघेल. ९८ वे वर्ष पूर्ण होत असलेल्या गिरगावचा राजाच्या मूर्तीचे रविवारी सकाळी लवकर विसर्जन केले जाईल.