नाशिक : घरात मुक्कामासाठी आलेल्या पाहुण्यांनी रात्रीच्या सुमारास घरातील १८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना बोरगड परिसरात घडली.
याबाबत फिर्यादी संध्या अभिमन निकम (वय ४५, रा. आश्रमशाळेसमोर, बोरगड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी सागर सावळीराम फुलारे व जयश्री शांताराम बोरसे हे निकम यांच्या घरी दि. १७ ऑगस्ट रोजी मुक्कामी आले होते.
दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान निकम या झोपलेल्या असताना दोघा आरोपींनी घरातील पंचपात्रीत ठेवलेली ९ हजार रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाची सोन्याची चीप व ९ हजार रुपये किमतीचा १ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मणी असा एकूण १८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार संजय गवारे करीत आहेत.