Saturday, September 6, 2025

Anant Chaturdashi 2025: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बाप्पाला भावपूर्ण निरोप

Anant Chaturdashi 2025: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बाप्पाला भावपूर्ण निरोप
मुंबई: अनंत चतुर्थीनिमित्त (Anant Chaturdashi 2025) मुंबईसह अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमली आहे. यादरम्यान काही दहा दिवसांच्या घरगुती गणेश मूर्त्यांचे देखील विसर्जन होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाला देखील आज पारंपरिक आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. वर्षा येथील एका कृत्रिम तलावात देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यासह गणेश मूर्ती विसर्जित केली. ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर प्रसारित करण्यात आला आहे.  
 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी असे म्हटले की, "आज आपण वर्षा येथे एका कृत्रिम तलावात गणपतीचे विसर्जन केले. बाप्पांनी आपल्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला १० दिवसांसाठी आशीर्वाद दिला. राज्यात मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुका सुरू आहेत आणि मला आशा आहे की सर्व काही शांततेत पार पडेल आणि कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल"
Comments
Add Comment