Saturday, September 6, 2025

३,१९० कोटींचे मालक अमिताभ बच्चन; पण संपत्तीचा वारस कोण? कोणाला किती मिळणार?

३,१९० कोटींचे मालक अमिताभ बच्चन; पण संपत्तीचा वारस कोण? कोणाला किती मिळणार?

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे केवळ अभिनयाचेच नव्हे तर प्रचंड संपत्तीचेही बादशाह आहेत. अनेक संकटांवर मात करत आणि दिवाळखोरीचा अनुभव घेतल्यानंतरही त्यांनी पुन्हा उभारी घेतली. आज त्यांची एकूण संपत्ती ३,१९० कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यांची ही संपत्ती आणि या संपत्तीचा वारस कोण, हा प्रश्न अनेक चाहत्यांना पडतो.

अमिताभ बच्चन यांची अब्जावधींची मालमत्ता!

बॉलिवूडचे शहंशाह आणि "अँग्री यंग मॅन" म्हणून ओळखले जाणारे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आयुष्यात संघर्ष, दिवाळखोरी, गंभीर आजार, राजकीय वाद अशा असंख्य वादळांना तोंड दिले. तरीही ते पुन्हा उभे राहिले आणि आज तब्बल ३,११० कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.

लाइफस्टाइल एशियाच्या अहवालानुसार, बिग बींच्या आलिशान जीवनशैलीत मुंबईतील अनेक बंगल्यांचा समावेश आहे. त्यापैकी ‘जलसा’ बंगल्याची किंमतच तब्बल ११२ कोटी रुपये आहे. काही काळापूर्वी त्यांनी मुंबईतील आपला ‘प्रतिक्षा’ हा ५० कोटी रुपयांचा बंगला थेट मुलगी श्वेता बच्चनला गिफ्ट दिला होता. शिवाय, त्यांच्याकडे बेंटले, रोल्स रॉयस, रेंज रोवरसारख्या गाड्यांचा ताफा आहे. याशिवाय २६० कोटी रुपयांचे प्रायव्हेट जेटदेखील त्यांच्याकडे आहे.

अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत २०० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांना "फिल्म इंडस्ट्रीचा वन-मॅन आर्मी" म्हणूनही गौरवण्यात आलं आहे. चार राष्ट्रीय पुरस्कार, १६ फिल्मफेअर पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, तसेच पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि फ्रान्स सरकारचा "नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर" यांसारखे बहुमान त्यांच्या नावावर आहेत.

१९८२ मधील ‘कुली’ चित्रपटाच्या अपघातात त्यांचा जीव धोक्यात आला होता, पण चाहत्यांच्या प्रार्थना आणि त्यांच्या लढाऊ वृत्तीमुळे ते वाचले. १९९० च्या दशकात एबीसीएल कंपनीच्या अपयशामुळे ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आले होते. मात्र, "कौन बनेगा करोडपती" या शोने त्यांना नवजीवन दिले आणि पुन्हा यशाच्या शिखरावर पोहोचवले.

बिग बींच्या संपत्तीचे कायदेशीर वारसदार म्हणजे पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन. २०११ मध्ये त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले होते की, "माझ्या मृत्यूनंतर माझी संपत्ती मुलगा आणि मुलगी यांच्यात समान वाटली जाईल, यात कुठलाही भेदभाव नसेल." त्यामुळे श्वेताला मुलाप्रमाणेच हिस्सा मिळणार आहे.

'प्रतीक्षा' बंगला श्वेताला गिफ्ट

अमिताभ बच्चन यांनी मागील वर्षी आपला 'प्रतीक्षा' बंगला मुलगी श्वेताला गिफ्ट म्हणून दिला होता, ज्याची किंमत सुमारे ५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

अमिताभ बच्चन: एक 'वन-मॅन इंडस्ट्री'

१९७०-८० च्या दशकात 'अँग्री यंग मॅन' म्हणून लोकप्रिय झालेल्या अमिताभ बच्चन यांनी ५० वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले आहे. 'कौन बनेगा करोडपती' या शोमधूनही त्यांनी मोठी कमाई केली. त्यांना चार राष्ट्रीय पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित केले आहे. फ्रेंच दिग्दर्शक फ्रँकोइस ट्रूफॉट यांनी त्यांना 'वन-मॅन इंडस्ट्री' असे संबोधले होते.

अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीचा आढावा  –

  • अमिताभ बच्चन : ३,११० कोटी रुपये (प्रतिक्षा गिफ्ट केल्यानंतर)

  • जया बच्चन : १,०८३ कोटी रुपये

  • ऐश्वर्या राय बच्चन : ८२८ कोटी रुपये

  • अभिषेक बच्चन : २८० कोटी रुपये

  • श्वेता बच्चन : ११० कोटी रुपये (प्रतिक्षा वगळता)

बिग बींची सून ऐश्वर्या राय बच्चनला थेट कायदेशीर हिस्सा मिळणार नाही, मात्र अभिषेक बच्चनची पत्नी म्हणून ती आणि आराध्या अप्रत्यक्षपणे या संपत्तीशी जोडलेल्या राहतील.

अगदी आजच्या घडीला देखील ८३ वर्षांचे अमिताभ बच्चन मोठ्या आणि छोट्या पडद्यावर तितक्याच जोमाने सक्रिय आहेत आणि खऱ्या अर्थाने ते भारतीय चित्रपटसृष्टीचे "महानायक" ठरले आहेत.

Comments
Add Comment