गणेशोत्सवाला गालबोट - पुण्यात गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

पुणे : ऐन गणेश विसर्जनाच्या तयारीत असतानाच पुण्यामध्ये सणाला गालबोट लागले. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून आरोपी गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अवघ्या १९ वर्षीय आयुष कोमकरवर शुक्रवारी रात्री दोघांनी अंदाधुंद गोळीबार केला. तीन गोळ्या लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या आयुषचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.


दरम्यान आज, शनिवारी पुण्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषद घेत आयुष कोमकर हत्या प्रकरणाबाबत माहिती दिली. निखिल पिंगळे यांनी सांगितले की, आयुष गणेश कोमकर असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. आयुष क्लासवरून घरी येत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला.


प्राथमिक माहितीनुसार दोन अज्ञात व्यक्तींनी आयुषवर हल्ला केल्याची शक्यता आहे. आयुष हा वनराज आंदेकर हत्येतील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. आयुष हा वनराज आंदेकरचा भाचा होता. या घटनेत ज्याचा सहभाग असेल, त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले. आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेची सहा पथके तयार करण्यात आली आहेत. मृताला न्याय देणं आमचे काम आहे. आता चुकीला माफी नाही, कोणताही गुन्हा करताना १०० वेळा विचार करा, असेही त्यांनी म्हटले आहे.


वनराज आंदेकर हा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक होता. त्याच्यावर १ सप्टेंबर २०२४ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी गणेश कोमकर सध्या तुरुंगात आहे. गेल्या काही दिवसांपासून वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेतला जाणार असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे कट रचल्याबाबत एकाला अटक केली होती आणि ६ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, कर्नाटकमधील बंजारा समाजाला दिलासा मुंबई : हैद्राबाद गॅझेटनुसार

निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांची यादी जाहीर; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले!

सिंधुदुर्गच्या प्रभारीपदी मंत्री नितेश राणे तर निवडणूक प्रमुखपदी प्रमोद जठार यांची निवड मुंबई : राज्यातील

आता दुर्गम भागांतही इंटरनेट सेवा पोहोचेल

मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रख्यात स्टारलिंक कंपनीशी माहिती तंत्रज्ञान विभागाचा सामंजस्य

शरद पवारांना धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, अतुल देशमुखसह अनेक जण शिवसेनेत दाखल

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर होताच

हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर?

भिगवण : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या येत आहेत. तशी चर्चा भोर तालुक्यात जोर धरत

शिंदेंच्या आमदाराची 'ती' ऑफर भाजपने झिडकारली

संजय गायकवाड-विजयराज शिंदे यांच्यात 'सिटिंग-गेटिंग'वरून जुंपली! बुलढाणा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या