Tuesday, September 30, 2025

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २ दिवसांची विशेष कॅज्युअल रजा देण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या अधिसूचनेनुसार, ही रजा १४ आणि १५ नोव्हेंबर २०२५ रोजी 'मातृ-पितृ वंदना' योजनेअंतर्गत दिली जाईल. परंतु, या रजेसाठी कर्मचाऱ्यांना विहित पोर्टलद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी २०२१ मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांच्या पहिल्या भाषणात ही योजना जाहीर केली होती. अधिसूचनेत म्हटले आहे की, "आसामचे राज्यपाल 'मातृ-पितृ वंदना' योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना १४ नोव्हेंबर २०२५ (शुक्रवार) आणि १५ नोव्हेंबर २०२५ (शनिवार) रोजी विशेष कॅज्युअल रजेची घोषणा करताना आनंद होत आहे. यासोबतच, अधिसूचनेत असेही नमूद केले आहे की, कर्मचारी या योजनेअंतर्गत १६ नोव्हेंबर (रविवार) ची रजा देखील या सुट्ट्यांसह एकत्र करू शकतात.

ही विशेष रजा देण्यामागील उद्देश असा आहे की, कर्मचारी त्यांच्या वृद्ध पालकांसोबत किंवा सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालवू शकतील. त्यांचा आदर करता येईल आणि त्यांची काळजी घेतली जाऊ शकेल. कर्मचारी त्यांच्या मनोरंजनासाठी या रजा घेऊ शकणार नाहीत. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांचे पालक किंवा सासू-सासरे नाहीत त्यांना या रजा मिळणार नाहीत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा