
मोहित सोमण: काल घसरण होते ना होते तोच रूपयांच्या घसरणीसह सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सलग पाच दिवस सोन्यात मोठी वाढ झाल्यानंतर भूराजकीय कारणांमुळे सोने किरकोळ दराने स्वस्त झाले होते. मात्र आज पुन्हा सोन्याने 'युटर्न' मा रल्याने दरपातळी मोठ्या प्रमाणात वाढली. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७६ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५८ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामु ळे प्रति ग्रॅम सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी १०७६२ रूपयांवर, २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ९८६५ रूपयांवर, १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ८०७२ रूपयांवर गेला आहे.माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर ७६० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याचा प्रति तो ळा दर ७०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर ५८० रूपयांनी वाढला आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १०७६२० रूपये, २२ कॅरेटसाठी ९८६५० रूपये, १८ कॅरेटसाठी ८०७२० रूपयांवर पोहोचला आहे.
आज मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १०७६२ रूपये, २२ कॅरेटसाठी ९८६५ रूपये, १८ कॅरेटसाठी ८१७० रूपये आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MC X) मध्ये सोन्याचा निर्देशांक आज संध्याकाळपर्यंत ०.३४% वाढला आहे. त्यामुळे एमसीएक्समधील सोन्याची दरपातळी १०६७७९ रूपयांवर गेली.
आज जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०५% वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरील सोन्याचे मानक (Standards) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.२१% वाढ झाली ज्यामुळे द रपातळी प्रति डॉलर ३५५३.२७ औंसवर गेली आहे. आज दिवसभरात सोन्याच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली होती. आज जागतिक अस्थिरतेच्या फटक्यानंतर सोन्यात प्रचंड प्रमाणात मागणी वाढल्याने सोने निर्देशांक थेट १ ते २% दराने उसळला होता. भारतीय सराफा बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने भारतीय बाजारातही सोन्याच्या दरात सपोर्ट लेवल मिळू शकली नाही. आज भारतीय गुंतवणूकदारांनीही सोन्याच्या प्रत्यक्ष अथवा ईटीएफ गुंतवणूकीत वाढ केल्याने सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. जागतिक बाजारपेठेतही आगामी युएस नॉन फार्म पेरोल डेटाकडे गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यातील स्पॉट मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अशा कारणांमुळे दिवसभरात सोने महागले होते.
आजच्या सोन्याच्या टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'एमसीएक्सवर सोन्याचा भाव ३०० रुपयांनी वाढून १,०६,७०० रुपयांवर व्यवहार झाला, कारण अमेरिकन नॉनफार्म पे रोल्स आणि बेरोजगारी डेटाच्या आधी बाजाराची स्थिती असल्याने कॉमेक्स सोन्याच्या भावात $३,५५० च्या जवळ वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष फेडच्या सप्टेंबरच्या बैठकीत आहे जिथे दर कपात अपेक्षित आहे, तर चालू टॅरिफ अनिश्चितता सु रक्षित-आश्रय मागणीला चालना देत आहेत. एकत्रितपणे, हे घटक सोन्याला तेजीच्या संरचनेत ठेवत आहेत. जोपर्यंत किमती १०६४५० रूपयांच्या वर टिकून राहतील तोपर्यंत व्यापक सेटअप सकारात्मक राहील, जोपर्यंत मजबूती १०७२६० रूपयांच्या जवळ प्रति काराकडे वाढण्याची अपेक्षा आहे. यावरील निर्णायक ब्रेक पुढील वाढीचा मार्ग मोकळा करू शकतो, तर फक्त १०६१५० रूपयांच्या खाली घसरण कमकुवतपणा दर्शवेल.'
चांदीच्या दरात मोठी घसरण !
चांदीच्या दरात कालच्या स्थिरतेनंतर आज मात्र घसरण झाली आहे. यापूर्वी सलग तीनदा चांदीत दरवाढ झाली होती स्पॉट बेटिंगमध्ये वाढलेल्या मागणीसह वाढलेल्या औद्योगिक मागणीमुळे चांदी गेल्या आठवड्यात महागली होती. आज मात्र सोन्यात गुंतवणूकदा रांनी लक्ष केल्याने चांदीत आज मागणी घटली असल्याने अंतिमतः चांदीत घसरण झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज १ रूपयाने, प्रति किलो दरात १००० रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे चांदी प्रति ग्रॅम दर १२६ रुपयांवर व प्रति किलो दर १२६००० रुपयांवर गेला आहे. जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०९% घसरण झाली आहे. भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम दर १३६० रूपये, प्रति किलो दर १३६००० रुपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.३७% वाढ झाली आहे. त्यामुळे एमसीएक्समधील दरपातळी १२४३७३ रूपयांवर गेली आहे.