
मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी असे अनेक दिग्गज ज्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येतात. दरवर्षी लाखो भाविक तासन तास रांगेत उभे राहून ज्या गणपतीचे दर्शन घेतात तो म्हणजे लालबागचा राजा. मुंबईसह देशाविदेशातही या गणपतीविषयी भाविकांमध्ये उत्सुकता आहे. यामुळेच दरवर्षी लाखो भाविक गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात. यंदाही लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महत्त्वाची माहिती दिली आहे.
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्याकरीता गुरूवार दि. ०४-०९-२०२५ रोजी चरणस्पर्शाची रांग रात्री १२:०० वाजता व मुखदर्शनाची रांग शुक्रवार दि. ०५-०९-२०२५ रोजी रात्री १२:०० वाजता बंद करण्यात येईल.
For the preparation of Lalbaugcha Raja’s immersion procession, the queue… pic.twitter.com/0YNPhtoqs0 — Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) September 2, 2025
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्याकरिता गुरुवार ४ सप्टेंबर २०२५ रोजी चरणस्पर्शाची रांग रात्री १२ वाजता बंद करण्यात आली आहे. आता लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची रांग शुक्रवार ५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजता बंद केली जाईल. यानंतर विसर्जन मिरवणुकीचे नियोजन केले जाईल. भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

३६० अंश फिरणारा तराफा, पाण्याचे फवारे ठरणार आकर्षणाचा केंद्रबिंदू! मुंबई : राज्यातील गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला असून, बाप्पाला निरोप ...
लालबागच्या राजाची वाढती लोकप्रियता
दरवर्षी लाखो भाविक गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात. ज्यांना थेट दर्शन घेणे जमत नाही असे अनेकजण व्हिडीओच्या माध्यमातून लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. व्हिडीओचा पर्याय उपलब्ध असला तरी अनेकांचे आजही लालबागच्या राजाच्या पायाशी डोकं टेकवल्यावरच समाधान होते. यामुळे लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शासाठी दरवर्षी प्रचंड गर्दी उसळते. ज्यांना कोणत्याही कारणामुळे रांगेत जास्त वेळ उभे राहणे शक्य नसते असे अनेकजण मुखदर्शनाच्या रांगेत उभे राहतात. लालबागच्या राजाचे मुखदर्शन घेतात आणि आनंदाने आपल्या पुढील कामांसाठी रवाना होतात. लालबागच्या राजाची ही लोकप्रियता दरवर्षी वाढत आहे.