
प्रतिनिधी: आजपासून वशिष्ठ लक्झरी फॅशन लिमिटेड (Vashistha Luxury Fashion Limited) हा आयपीओ बाजारात दाखल झाला आहे. कंपनीला पहिल्या दिवशी किरकोळ प्रतिसाद गुंतवणूकदारांकडून मिळाला आहे. आयपीओ बीएसई एसएमई (BSE SME) प्रवर्गात दाखल असून ८.८७ कोटींचा आयपीओ ५ ते ७ सप्टेंबर पर्यंत बाजारात उपलब्ध असणार आहे. ०.०८ कोटी शेअर्सहा फ्रेश इशू असणार आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राईज बँड (Price Band) १०९ रूपये ते १११ रूपये निश्चित केला आहे. १२०० शेअरचा हा गठ्ठा (Lot) गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. या आयपीओतील गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी किमान २६६४०० रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. Expert Global Consultants Pvt Ltd) कंपनी आयपीओसा ठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून,Bigshare Services Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. मार्केट मेकर म्हणून Nirman Share Brokers Pvt Ltd कंपनी उपलब्ध असेल.
११ सप्टेंबरला पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आयपीओचे वाटप (Allotment) अपेक्षित असून कंपनी १५ सप्टेंबरला बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. गुंतवणूकदारांना किमान २४०० शेअरची बोली (Bidding) लावता येईल. एकूण ७९९२०० शेअरपै की ९.४६% वाटा गुंतवणूकीसाठी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Buyers QIB) उपलब्ध असेल तर मार्केट मेकरसाठी ५.११% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असून विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institutional I nvestors NII) यांच्यासाठी ३३.१८% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल.
रविंद्र धारेशिवकर, मुस्ताक ओडिया, अर्चना ओडिया हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल १००% होते ते आयपीओनंतर घसरत ६६.०८% वर खाली येऊ शकते. २०१० साली ही कंपनी स्थापन झाली होती. कंपनी प्रामु ख्याने उच्च दर्जाचे लक्झरी फॅशन ब्रँड निर्यात करते.ही कंपनी युरोप, यूके, यूएसए, ऑस्ट्रेलिया आणि तुर्कीमधील फॅशन ब्रँडना सेवा देणारी १००% निर्यात कंपनी आहे,जी कॉचर आणि प्रेट-ए-पोर्टर विभागांसाठी कस्टमाइज्ड पोशाख डिझाइन ऑफर करते. कंपनी तिच्या उपकंपनी (Subsidiary) 'वशिष्ठ एम्ब्रॉयडरी' प्रायव्हेट लिमिटेडद्वारे मुंबईत एक नमुना युनिट चालवते.
कंपनीच्या महसूलात आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४६% वाढ झाली असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) ३४६% वाढ झाली होती. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीच्या एकूण उत्पन्नात वाढ होत उत्पन्न १०.८८ को टींवर पोहोचले जे आर्थिक वर्ष २०२४ मार्च तिमाहीत ७.४५ कोटी होते. मागीलवर्षी तिमाहीतील ०.३२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १.४२ कोटीवर वाढला आहे. कंपनीचा ईबीटा (करपूर्व कमाईत EBITDA) मागील वर्षातील ०.७३ कोटीवरून या तिमाहीत २.०७ कोटींवर पोहोचला. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) २६.१६ कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर खेळत्या भांडवलासाठी (Working Capital Requirements), थकबाकी चुकवण्यासाठी तसेच देयकांना अँडव्हान्स रक्कम देण्यासाठी, व इतर दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी कंपनीला किती सबस्क्रिप्शन मिळाले?
कंपनीला पहिल्या दिवशी दुपारी १२.४८ वाजेपर्यंत ०.०५ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून ०.०९ वेळा, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ० वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ० वेळा सबस्क्रिप्शन मिळाले.