
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. आज पहाटे गिफ्ट निफ्टीत झालेल्या वाढीमुळे आजही बाजारात वाढीचे संकेत मिळत आहे. पण कळीचा मुद्दा आहे की ही रॅली अखेरच्या सत्रात कायम राहू शकेल. आज बा जार सुरू झाल्यावरच सेन्सेक्स ३१०.४० अंकाने व निफ्टी ९५.०५ अंकांने वधारला. सत्र सुरूवातीला सेन्सेक्स बँक निर्देशांकात १०३.४० अंकाने व बँक निफ्टीत १४८.७० अंकांने वाढ झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४०%,०.०८% वाढ झा ली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४६%,०.१६% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४६%,०.१६% वाढ झाली आहे. सकाळी मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.९२%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.७६% ), रिअल्टी (०.७१%) निर्देशांकात वाढ झाली आहे. तर घसरण एफएमसीजी (०.७३%), मिडिया (०.०३%) निर्देशांकात घसरण झाली.
काल जीएसटी काऊन्सिल बैठकीत जीएसटी प्रणालीत परिवर्तन व दरकपातीला अंतिम मंजुरी मिळाली असल्याने कालपासून बाजारात तेजीचे चित्र आहे. तरीही भूराजकीय अस्थिरतेच्या फटक्यामुळे काल अखेरच्या सत्रात अपेक्षित रॅली बाजारात झाली नाही. आ जही अस्थिरता निर्देशांक सकाळच्या सत्रात २.२८% घसरला आहे. दरम्यान आजही जीएसटी कपातीचा ट्रिगर कायम राहिल्याने आजही बाजारात वाढ अपेक्षित असली तरी तेल व गॅस, फार्मा, मिडिया निर्देशांकात दबाव कायम असल्याने आज फायनांशियल सर्वि सेस, बँक, आयटी, मिड स्मॉल कॅप सपोर्ट लेवल राखण्यास मदत करतील का हे अंतिम सत्रात कळेल. मात्र तत्पूर्वी बाजारातील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) हालचाल बाजारात अंतिम दिशा ठरवू शकतील.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ मस्टेक (४.०४%), सम्मान कॅपिटल (३.७६%), जेपी पॉवर वेचंर (३.१९%), एसकेएफ इंडिया (२.७२%), पेज इंडस्ट्रीज (२.३२%), सोना बीडब्लू प्रिसाईज (२.२९%), एचडीएफसी बँक (२.१९%), हुडको (२.०१%), आयसीआयसी आय प्रोडूंनशिअल लाईफ (१.९७%), इंद्रप्रस्थ गॅस (१.७५%), डीएलएफ (१.५७%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (१.५६%) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण ओला इलेक्ट्रिक (४.८१%), आयटीसी (१.९४%), वरूण बेवरेज (१.६८%), इमामी (१.६७%), नेस्ले इंडिया (१.५३%), कोलगेट पामोलीव (१.३९%), न्यू इंडिया ॲशुरन्स (१.३०%), मारिको (१.०४%), होनसा कंज्यूमर ड्युरेबल्स (०.९८%), जनरल इन्शुरन्स (०.८२%) समभागात झाली आहे.
सकाळी बाजारावर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'काल बाजारात दिसलेला सुरुवातीचा उत्साह टिकू शकला नाही. अपेक्षित शॉर्ट-कव्हरिंग झाले नाही, ज्या मु ळे किमती जवळ आल्या. तसेच, बाजाराने आधी जीएसटी सुधारणांना अंशतः सूट दिली होती. भू-राजकीय आणि टॅरिफ-संबंधित प्रतिकूल परिस्थितीतही उच्च मूल्यांकनामुळे अस्वलांना बाजारात शॉर्ट पोझिशन्स जमा करण्यास मदत झाली. म्युच्युअल फंडांनी इ क्विटीमध्ये सतत मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने ऑगस्टमध्ये ७०५०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. बाजारात स्थिर निधी प्रवाहामुळे उच्च पैशाची ताकद असल्याने म्युच्युअल बंड खरेदी घसरणीदरम्यान बाजाराला आधार देईल. सध्याच्या बाजारातील ट्रेंडचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ओव्हरव्हॅल्यू केलेल्या मिड आणि स्मॉलकॅप्समधील कमकुवतपणा आणि बऱ्यापैकी मूल्य असलेल्या लार्जकॅप्समधील सापेक्ष ताकद. हा एक निरोगी ट्रेंड आहे जो पुढेही चालू राहण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.'
यामुळे आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकातील हालचाल अखेरच्या सत्रात पाहणे पुढील दोन तीन दिवसांसाठी महत्वाचे ठरू शकते. तरीदेखील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्रीचा धोका कायम असला तरी भारतीय गुंतवणूकदारांनी अधिकचा भरोसा बाजारात दाखवल्यास होणारी तूट भरून निघण्यास बाजारात हातभार लागू शकतो.