Thursday, September 18, 2025

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मान, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा समावेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मान, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा समावेश
नवी दिल्ली:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिक्षक दिनानिमित्त देशभरातील ४५ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' देऊन सन्मानित केले आहे.ज्यात महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा देखील समावेश आहे. दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी, देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो. आदर्श शिक्षकांचा त्यांच्या अध्यापन कार्यासाठी या दिवशी विशेष सन्मान केला जातो.  नवी दिल्लीत या खास प्रसंगी राष्ट्रपतींच्या हस्ते 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' बहाल केला जातो. या वर्षी देखील, शिक्षक दिन २०२५ च्या निमित्ताने, आपल्या देशाच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अशा ४५ उत्कृष्ट आणि समर्पित शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' देऊन सन्मानित केले.
Comments
Add Comment