Friday, September 5, 2025

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याची अखेर सेन्सेक्स,FMCG,IT घसरणीने ! परिस्थितीच्या चक्रव्यूहात 'शेअर बाजार' Consolidation सुरु

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याची अखेर सेन्सेक्स,FMCG,IT घसरणीने ! परिस्थितीच्या चक्रव्यूहात 'शेअर बाजार' Consolidation सुरु

मोहित सोमण: आज परिस्थितीच्या चक्रव्यूहात शेअर बाजार अडकल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. जागतिक दबाव व अस्थिरतेचा घरगुती अंडरकरंट या दोन्ही एकत्रीकरणाचा फटका शेअर बाजारात बसला. अंतिमतः अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ७.२५ अंकाने बंद झाला असून ८०७१०.७६ पातळीवर घसरला आहे व निफ्टी मात्र ६.७० अंकाने वाढला असून २४७४१.०० पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २०.३१ अंकाने व बँक निफ्टीत ३९.१० अंकाने वाढ झाली आहे. सेन्सेक्स मि डकॅप ०.१०% घसरला असून स्मॉलकॅपमध्ये मात्र ०.०९% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२०%,०.१९% घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये घसरण आज ब्लू चिप्ससह मिडकॅप शेअर खालावल्याने बाजार किरकोळ अंकाने घसरला. नि फ्टी मात्र मिड स्मॉल कॅप दोन्ही समभागात (Stocks) मध्ये वाढ झाल्याने निफ्टीला सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली. आज सकाळपासूनच तेजी कायम असली तरी अंतिमतः शेवटच्या काही तासांत आयटी समभागातील मोठ्या घसरणीसह कंज्यूमर ड्युरेबल्स व एफएमसीजी शेअर्समध्ये वाढलेल्या नफा बुकिंग (Profit Booking) मुळे निर्देशांकात घसरण झाली.निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये आज सर्वाधिक वाढ मिडिया (०.५९%), मेटल (०.६८%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (० .७८%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.६७%) बाजारात झाली आहे. सर्वाधिक घसरण मात्र आयटी (१.४४%), एफएमसीजी (१.४२%), रिअल्टी (१.१६%) निर्देशांकात झाली आहे.

काल युएस बाजारातील एपीआय खाजगी पेरोल आकडेवारीचा दबाव पडल्याने संमिश्र अंकांनी युएस शेअर बाजार बंद झाला होता. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. खासकरून आगामी नॉन फार्म पेरोल (बिगर) पेरोल डेटा आकडेवारी येणार असल्याने आज च्या सुरुवातीच्या करात डाऊ जोन्स (०.००%) वगळता एस अँड पी ५०० (०.८३%), नासडाक (०.९८%) बाजारात मोठी रॅली झाली आहे. असे असताना सप्टेंबर महिन्यातील दरकपातीकडे युएस बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित असल्याने त्याचा सकारात्म क परिणाम भारतीय बाजारात अपेक्षित आहे. याखेरीज डोनाल्ड ट्रम्प यांच्या फार्मावरील २००% टॅरिफ भपकीनंतर ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्याची वाट गुंतवणूकदार बघत असल्याने त्या पद्धतीचाही दबाव बाजारात कायम असल्याने भारतीय बाजारातील निर्यातप्रणि त वस्तू व सेवेवर अस्थिरता निर्माण झाली. आशियाई बाजारात अखेरच्या सत्रापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाल्याने एकही बाजारात घसरण झाली नाही. हा एक कंसोलिडेशन फेजमधील आशेचा किरण वाटतो. गिफ्ट निफ्टीसह (०.०४%), निकेयी २२५ (०.९४%), स्ट्रे ट टाईम्स (०.२४%), हेंगसेंग (१.४५%), कोसपी (०.१३%), शांघाई कंपोझिट (१.२२%), तैवान वेटेड (१.२८%) बाजारात मोठी वाढ झाली. त्यातुलनेत आज भारतातील सकाळची मोठी रॅली घसरणीत बदलली आहे.

आज दिवसभरात सोन्याचा निर्देशांकात सकाळपासूनच मोठी वाढ झाली. आगामी नॉन फार्म पेरोल डेटा अपेक्षित असल्याने सावधगिरी बाळगताना सोन्यातील गुंतवणूक वाढवल्याने सोने महागले. आज संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशां कात ०.०६% वाढ झाली आहे. आगामी ओपेक बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. स्पॉट बाजारात प्रस्तावित कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ अपेक्षित असल्याने मागणी कमी झाली. पर्यायाने आज सलग तिसऱ्यांदा कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झा ली. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या (Crude Oil) WTI Futures निर्देशांकात ०.३३% घसरण झाली असून Brent Future निर्देशांकात ०.२१% घसरण झाली आहे. आज रूपयांच्या तुलनेत डॉलर वाढल्याने रूपया आज ८८.३६ इतक्या निचांकी पातळीवर (All time Low) वर पोहोचला आहे. असे असताना आज एफएमसीजी व आयटी हेवीवेट शेअर्समध्ये आज घसरण झाली असून मिडिया, ऑटो शेअर वाढले.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ नेटवेब टेक्नॉलॉजी (१६.११%), ब्रेनबीज सोलूशन (१३.८८%), जीएमडीसी (११.८२%), वोडाफोन आयडिया (९.३८%),गॉडफ्रे फिलिप्स (५.९३%), जेपी पॉवर वेचंर (४.९५%), बीएसई (४.५१%), निवा बुपा हेल्थ (४.२०%), स्विगी (३ .७७%), आदित्य बिर्ला फॅशन (३.६७%), होंडाई मोटर्स (२.५२%), गोदरेज अँग्रोवेट (२.४९%), एम अँड एम (२.२९%), अशोक लेलँड (२.१६%), मारूती सुझुकी (१.५९%), झी एंटरटेनमेंट (१.०४%), हिन्दुस्तान झिंक (०.५९%), टाटा स्टील (०.५२%) समभागात झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण ओला इलेक्ट्रिक (७.१०%), वरूण बेवरेज (४.०६%), ईक्लर्क सर्विसेस (३.३४%), न्यू इंडिया ॲशुरन्स (२.८५%), टोरंट पॉवर (२.४७%), मस्टेक (२.१४%), सिमेन्स (२.०७%), ओबेरॉय रिअल्टी (२.००%), एचसीएल टेक्नॉलॉजी (१.६८%), इंडिया सिमेंट (१.५७%), कोलगेट पामोलीव (१.६८%), टीसीएस (१.५३%), इन्फोसिस (१.२६%), रेमंड लाईफस्टाईल (०.५७%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'भारतीय शेअर बाजार आज स्थिर राहिले, परंतु प्रमुख निर्देशांकांनी आधार पातळीवर खरेदी केल्याने दिवसा च्या नीचांकी पातळीपासून ते पुन्हा वर येताच भावना थोडीशी सकारात्मक राहिली. मागणी पुनरुज्जीव नाच्या अपेक्षेवर ऑटो क्षेत्राने वाढ कायम ठेवली. स्थानिक गुंतवणूकदारांनी लार्ज कॅपच्या पलीकडे मूल्य आणि वाढीच्या संधींमध्ये बदल केल्याने मध्यम आणि स्मॉलकॅप सह भागासह व्यापक बाजारपेठांनी चांगली कामगिरी केली. जागतिक संकेतांनी देखील पाठिंबा दर्शविला, यूएस जॉब्स रिपोर्टच्या आधी यूएस आणि आशियाई बाजारपेठांमध्ये उच्च व्यापार झाला, फेड दर कपातीच्या अपेक्षांसाठी एक प्रमुख ट्रिगर. नजी कच्या काळात, बाजार श्रेणीबद्ध राहण्याची शक्यता आहे, खरेदी-ऑन-डिप्स, विक्री-ऑन-रॅली धोरण गुंतवणूकदारांच्या वर्तनाचे मार्गदर्शन करते.'

आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना सेंट्रम ब्रोकिंग रिसर्चचे तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक निलेश जैन म्हणाले आहेत की,' बाजारात चांगली सुधारणा दिसून आली, निफ्टी त्याच्या २१-डीएमएच्या पातळीवर बंद झाला, जो सध्या २ ४७०० पातळी च्या आसपास आहे. तथापि, अलिकडच्या गतीला २४९८० पातळीवर ५०-डीएमएच्या (Displaced Moving Average DMA) जवळ प्रतिकाराचा (Resistance) सामना करावा लागला, जो निर्देशांकावरील सममितीय त्रिकोण पॅटर्नच्या वरच्या सी मेशी देखील जु ळतो. अपट्रेंडच्या नवीन टप्प्यासाठी, २५००० पातळीच्या वर निर्णायक ब्रेकआउट आवश्यक आहे. या पातळीच्या वर यशस्वी हालचाल २५३०० आणि अखेर २५५०० पातळीच्या दिशेने रॅलीसाठी दरवाजे उघडू शकते. नकारात्मक बाजूने, २४५२० पातळीच्या अली कडील स्विंग नीचांकी पातळीवर तात्काळ आधार (Immdiate Support) आहे. एकूणच, येत्या आठवड्यात निफ्टी २४४००-२५००० पातळीच्या विस्तृत श्रेणीत एकत्रित होण्याची अपेक्षा आहे.'

आजच्या बाजारातील रूपयावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतीय आयटीला अतिरिक्त शुल्क आकारण्याचे संकेत दिल्याने पुन्हा एकदा टॅरिफच्या चिंतेचा परिणाम भावनेवर झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सततचा एफआयआय विक्रीचा दबाव रुपयाच्या अवमूल्यनाच्या ट्रेंडमध्ये भर घालत आहे. बाह्य नकारात्मक परिस्थितीमुळे, रुपया ८७.९० - ८८.५० च्या श्रेणीत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.'

आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'एमसीएक्सवर सोन्याचा भाव ३०० रुपयांनी वाढून १,०६,७०० रुपयांवर व्यवहार झाला, कारण अमेरिक न नॉनफार्म पेरोल्स आणि बेरोजगारी डेटाच्या आधी बाजाराची स्थिती असल्याने कॉमेक्स सोन्याच्या भावात $३,५५० च्या जवळ वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष फेडच्या सप्टेंबरच्या बैठकीत आहे जिथे दर कपात अपेक्षित आहे, तर चालू टॅरिफ अनिश्चितता सु रक्षित-आश्रय मागणीला चालना देत आहेत. एकत्रितपणे, हे घटक सोन्याला तेजीच्या संरचनेत ठेवत आहेत.जोपर्यंत किमती १०६४५० रूपयांच्या वर टिकून राहतील तोपर्यंत व्यापक सेटअप सकारात्मक राहील, जोपर्यंत मजबूती १०७२६० च्या जवळ प्रतिकाराकडे वाढण्याची अपेक्षा आहे. यावरील निर्णायक ब्रेक पुढील वाढीचा मार्ग मोकळा करू शकतो, तर फक्त १०६१५० रूपयांच्या खाली घसरण कमकुवतपणा दर्शवेल.'

रूपयाबाबत प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,' अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतीय आयटीला अतिरिक्त शुल्क आकारण्याचे संकेत दिल्याने पुन्हा एकदा टॅरिफच्या चिंतेचा परिणाम भावनेवर झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सततचा एफआयआय विक्रीचा दबाव रुपयाच्या अवमूल्यनाच्या ट्रेंडमध्ये भर घालत आहे. बाह्य नकारात्मक परिस्थितीमुळे, रुपया ८७.९० - ८८.५० च्या श्रेणीत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.'

त्यामुळे आज आठवड्याची अखेर समाधानकारक नसली तरी ही कंसोलिडेशनची फेज सुरू आहे. आगामी दोन तीन दिवसांच्या नंतर बाजारात मोठी रॅली होण्याची शक्यता आहे.दरम्यान बाजारात नफा बुकिंग असून आगामी युएस आकडेवारीसह भारतातील आ यटी क्षेत्रातील समभागातही पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष राहील.

Comments
Add Comment