Friday, October 24, 2025
Happy Diwali

'लालबागच्या राजा'चे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला अपघात, एकाचा मृत्यू

'लालबागच्या राजा'चे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला अपघात, एकाचा मृत्यू

मुंबई : लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन दोघेजण दुचाकीवरुन घरी परतत होते. त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. दुचाकीला बेस्ट बसने धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. अपघात तरुणांच्या चुकीमुळे झाला की बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे ? याचा तपास पोलीस करत आहेत.

अपघातात देवांश पटेल या २२ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. देवांशचा मित्र स्वप्नील विश्वकर्मा हा २२ वर्षांचा तरुण गंभीर जखमी आहे. जखमी असलेल्या स्वप्नील विश्वकर्मावर पवई रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. देवांश आणि स्वप्नील हे दोघेही अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातील रहिवासी आहेत.

Comments
Add Comment