
३६० अंश फिरणारा तराफा, पाण्याचे फवारे ठरणार आकर्षणाचा केंद्रबिंदू!
मुंबई : राज्यातील गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला असून, बाप्पाला निरोप देण्याची वेळ समीप आली आहे. उद्या, ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने विसर्जन सोहळ्याची धूम पाहायला मिळणार आहे. घरगुती गणपतींपासून ते सार्वजनिक मंडळांच्या भव्य मूर्तींपर्यंत सर्वांचे विसर्जन पार पडणार असून, भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील गिरगाव चौपाटीवर विशेष तयारी करण्यात आली आहे. याचबरोबर, मुंबईकरांचा लाडका लालबागचा राजा याचं उद्या शाही मिरवणुकीत थाटामाटात विसर्जन होणार आहे. या सोहळ्यासाठी मंडळ व प्रशासनाने एकत्रितपणे भव्य तयारी केली असून, लाखो भाविक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत.

मुंबई : भारतात टेस्लाच्या एंट्रीची आतुरतेने वाट पाहिली जात होती आणि अखेर १५ जुलै रोजी हा ऐतिहासिक क्षण आला. मुंबईतील बीकेसी (BKC) परिसरात भव्य ...
फेस डिटेक्टरपासून मेटल डिटेक्टरपर्यंत सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त
मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असताना, लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबाग-परळ आणि गिरगाव परिसरात प्रचंड गर्दी होत आहे. देशभरातून लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल होत आहेत. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा सम्राट, मुंबईचा राजा, नरेपार्कचा राजा आणि राजा तेजुकायचा यांसारख्या प्रसिद्ध मंडळांच्या मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी ओसंडून वाहते. या पार्श्वभूमीवर सुरक्षेची जबाबदारी अधिक महत्वाची ठरते. यावर्षी प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व जीएसबी मंडळाने फेस डिटेक्शन प्रणाली कार्यान्वित केली आहे. याशिवाय अन्य काही मंडळांमध्ये मेटल डिटेक्टर व इतर सुरक्षा यंत्रणादेखील बसवण्यात आल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि प्रत्येक भाविकाला सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी पोलीस प्रशासन आणि मंडळे दोघेही एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत.

मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी असे अनेक दिग्गज ज्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येतात. दरवर्षी लाखो भाविक तासन तास रांगेत उभे राहून ज्या गणपतीचे ...
राजाच्या विसर्जनासाठी यंदा खास मोटराइज्ड तराफा
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा खास तराफ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे पारंपरिक तराफ्याऐवजी यंदा मोटराइज्ड तराफ्याचा वापर केला जाणार आहे. हा आधुनिक तराफा विशेषतः गुजरातमध्ये तयार करण्यात आला असून त्याची वैशिष्ट्ये अत्यंत अनोखी आहेत. हा तराफा ३६० अंशात फिरण्याची क्षमता बाळगतो, त्यामुळे विसर्जनाच्या वेळी गणेशमूर्ती सहजपणे समुद्रात नेली जाऊ शकते. याशिवाय, या तराफ्याच्या चहुबाजूला बसवलेल्या स्प्रिंकलर्समधून पाण्याचे फवारे उडणार आहेत, ज्यामुळे विसर्जनाचा सोहळा अधिक देखणा आणि भव्यदिव्य होणार आहे. विशेष म्हणजे, हा तराफा स्वतः मोटराइज्ड असल्याने त्याला समुद्रात नेण्यासाठी आता दुसऱ्या बोटीची मदत घेण्याची आवश्यकता नाही. विसर्जनाच्या या नव्या पद्धतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, यावर्षी लालबागच्या राजाचे विसर्जन नेहमीपेक्षा अधिक वेगळे आणि आकर्षक होणार आहे.
गिरगाव चौपाटी विसर्जनासाठी सज्ज
मुंबईतील अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गिरगाव चौपाटी विसर्जनासाठी पूर्णतः सज्ज झाली आहे. देशभरातून लाखो भाविक या सोहळ्याला उपस्थित राहतात, विशेषतः लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा सम्राट यांसारख्या प्रसिद्ध मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळते. सुरक्षेच्या दृष्टीने लालबागचा राजा आणि इतर मंडळांनी यंदा आधुनिक फेस डिटेक्टर यंत्रणा कार्यान्वित केली आहे. गिरगाव चौपाटीवर मुंबई महानगरपालिकेने विसर्जनाच्या अखेरच्या दिवसासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. गणेशभक्तांची प्रचंड गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीचे नियोजन नीट व्हावे यासाठी सूचनाफलक, मोठे व्यासपीठ, स्वच्छतागृह आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे लालबाग-परळ आणि गिरगाव परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होणार असून, यंदाही मुंबईकरांना विसर्जनाचा भव्य सोहळा अनुभवायला मिळणार आहे.