Ganesh Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी BMC चे मुंबईकरांना आवाहन

महापालिका प्रशासनाच्यावतीने नागरिकांना भरती व ओहोटीदरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन


मुंबई : येत्या शनिवारी ६ सप्टेंबर २०२५ रोजी अर्थात अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) च्या दिवशी मुंबईतील सर्व विसर्जनस्थळी नागरिकांनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या तसेच विसर्जनस्थळी जबाबदारीने आणि सतर्कतेने वागावे. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस दलाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

शनिवार ६ सप्टेंबर भरती ओहोटी वेळ:


यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी (शनिवार ६ सप्टेंबर २०२५) समुद्रात सकाळी ११.०९ वाजता ४.२० मीटरची भरती येणार असून, सायंकाळी ५.१३ वाजता १.४१ मीटरची ओहोटी तसेच रात्री ११.१७ वाजता ३.८७ मीटर उंचीची भरती असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ५.०६ मिनिटांनी ०.६९ मीटरची ओहोटी, सकाळी ११.४० वाजता ४.४२ मीटरची भरती असेल. त्यामुळे विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी भरती व ओहोटीदरम्यान सतर्क राहावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

"ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ पासून सावध राहण्याचा इशारा


ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच १०८ रूग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली आहे.

विसर्जनासाठी २९० कृत्रिम तलाव, तुमच्या नजीकचे तलाव पहा-


मुंबईत पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने यंदा सुमारे २९० कृत्रिम तलाव तयार केले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/HomePage%20Data/Whats%20New/ganpati_art_ponds.pdf या लिंकवर कृत्रिम तलावांची यादी उपलब्ध आहे. या यादीमध्ये संबंधित कृत्रिम तलावाची गुगल मॅप लिंकही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, क्यूआर कोड स्कॅन करुन किंवा बीएमसी व्हॉटसअॅप चॅटबॉटवरुनही कृत्रिम तलावांसंबंधित माहिती जाणून घेता येईल.

विसर्जनादरम्यान भाविकांनी कोणती काळजी घ्यावी?


विसर्जनादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या वतीने काही निर्देश देण्यात आले आहेत. जसे की-

  • विसर्जनावेळी भाविकांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये.

  • मूर्ती विसर्जनाकरीता महानगरपालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी.

  • काळोख असणाऱ्या ठिकाणी श्रीगणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाणे टाळावे.

  • महानगरपालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.

  • कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन दलाचे जवान, पोलिस किंवा जीवरक्षकांना कळवावे.

  • कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

  • भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नये.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य