 
                            काबूल: जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसच्या मते, गुरुवारी आग्नेय अफगाणिस्तानला ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप आला. या आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानची जमीन भूकंपाने हादरली आहे.
जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसच्या मते, या आठवड्याच्या सुरुवातीला, अफगाणिस्तानच्या पूर्व भागात एकामागून एक अनेक भूकंप झाले होते, ज्यामध्ये २,२०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते आणि ३,६०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या भूकंपांमुळे गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती आणि हजारो लोक बेघर झाले होते. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा आग्नेय अफगाणिस्तानमध्ये ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्यानंतर काही तासांत ४.१ रिश्टर स्केलने आणखी एकदा धरणीकंप झाला. ज्यामुळे या आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या विनाशकारी भूकंपांनंतरच्या धक्क्यांच्या मालिकेत आणखी भर पडली आहे.
या आधीच्या भूकंपांमध्ये २,२०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले, तर ३,६०० हून अधिक जखमी झाले, ज्यात अनेक गावे उद्ध्वस्त झाली आणि देशाच्या पूर्वेकडील हजारो लोक बेघर झाले आहेत.
१० किमी (सहा मैल) खोलीवर आलेला हा भूकंप, कुनार आणि नांगरहार प्रांतातील गावे उद्ध्वस्त करणाऱ्या, हजारो बेघर झालेल्या आणि ३,६०० हून अधिक लोक जखमी झालेल्या भूकंपांनंतर आला.
नांगरहार प्रांतातील आरोग्य विभागाचे प्रवक्ते नकीबुल्लाह रहीमी यांनी रॉयटर्सला सांगितले की भूकंपाचे केंद्र पाकिस्तान सीमेजवळील दुर्गम शिवा जिल्ह्यात होते. सुरुवातीच्या अहवालात बरकाशकोट परिसरात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे, परंतु अधिक तपशील अद्याप गोळा केले जात आहेत.
अफगाणिस्तानमधील सर्वात घातक भूकंप
GFZ ने म्हटले आहे की या भूकंपाची खोली १० किमी (६.२१ मैल) होती. जे अफगाणिस्तानमधील सर्वात घातक भूकंपांपैकी एक आहे. या भूकंपांमुळे कुनार आणि नांगरहार प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. तर रविवारी झालेल्या पहिल्या भूकंपाची तीव्रता ६ रिश्टर स्केल आणि खोली १० किमी (६ मैल) होती.
वाढती मानवी संकट
या भूकंपांमुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. मदत तसेच बचावासाठी गेलेल्या गटांनी इशारा दिला आहे की त्यांच्याकडील संसाधने आता संपत आली आहेत. संयुक्त राष्ट्र आणि इतर संस्थांनी अन्न, निवारा आणि वैद्यकीय पुरवठ्याची तीव्र गरज असल्याचे सांगितले आहे. या नवीन भूकंपामुळे आधीच संकटग्रस्त भागात आणखी त्रास वाढला आहे.
भारताकडून मदत
पहिल्या भूकंपानंतर भारताने अफगाणिस्तानला तातडीने मदत पाठवायला सुरुवात केली आहे. हानी झालेल्या भागांसाठी ब्लँकेट, तंबू ते ओआरएसपासून अनेक गरजेच्या गोष्टी भारताकडून अफगाणिस्तानातील भूकंपग्रस्तांना पुरविण्यात येत आहेत.

 
     
    




