Thursday, October 23, 2025
Happy Diwali

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या अभिनेत्रीला अटक

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या अभिनेत्रीला अटक

मिरा - भाईंदर : मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने काशीमिरा परिसरातील ठाकुर मॉलजवळ सेक्स रॅकेट चालवणाऱ्या अभिनेत्रीला अटक केली. पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत महिला विरोधी गुन्हे प्रकरणी कारवाई करणारा पोलिसांचा विभाग (Crime Against Women Unit / CAW) आणि कम्युनिटी पोलिसिंग कमिटी (CPC Unit) यांनी संयुक्तपणे कारवाई केली. ही कारवाई महिला पोलीस निरीक्षक सौरभी पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

खबऱ्यांनी दिलेल्या माहितीआधारे पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन पोलिसांनी अभिनेत्री अनुष्का मोनी मोहनदासला (मून दास) रंगेहात पकडले. अभिनेत्री मून दास वेश्या व्यवसायासाठी महिला पुरवत होती.

पोलिसांनी पकडलेली अभिनेत्री मून दास ही काही वर्षांपूर्वी मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती. विविध जाहिराती, म्युझिक अल्बम यातून ती झळकली होती. मून दासने हनी सिंग, मिका सिंग, उदित नारायण यांच्या म्युझिक अल्बममधून काम केले होते. लोफर नावाच्या बंगाली चित्रपटातही मून दास दिसली होती.

मून दास मोठी रक्कम मोजणाऱ्यांना बंगाली, तामीळ, तेलुगू चित्रपटांतून तसेच टीव्ही मालिकांतून झळकलेल्या अभिनेत्री वेश्या व्यवसायासाठी पुरवत होती. महाराष्ट्रात मून दास मोठे रॅकेट चालवत होती. वेश्या व्यवसायातून ती नियमितपणे लाखो रुपयांची कमाई करत होती.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी मून दासच्या प्रकरणात पिटा कायद्यांतर्गत (अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा) गुन्हा नोंदवला आहे. पुढील पोलीस तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >