Thursday, September 4, 2025

Stock Market: अखेरच्या सत्रात बाजारात 'धक्का' तरीही सेन्सेक्स १५०.३० व निफ्टीत १९.२५ अंकांने वाढ

Stock Market: अखेरच्या सत्रात बाजारात 'धक्का' तरीही सेन्सेक्स १५०.३० व निफ्टीत १९.२५ अंकांने वाढ

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर वाढीत झाली आहे. जीएसटी काऊन्सिलची बैठक काल आणि आज या दोन दिवसांच्या कालावधीत पार पडली आहे. त्यामुळे जीएसटीत सर्वसामान्यांसाठी मोठी दरकपात झाल्याने आज बाजाराला बूस्टर डोस मिळाला आहे. परिणामी आज शेअर बाजार उसळला. सेन्सेक्स १५०.३० अंकाने वाढत ८०७१८.०१ पातळीवर व निफ्टी ५० हा १९.२५ अंकाने वाढत २४७३४.३० पातळीवर स्थिरावला आहे. मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये सकाळी झालेली वाढ आज घसरणीत बद लल्याने आज बाजारातील वाढीला आज ब्रेक लागला आहे. दोन्ही सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६०%,०.६०% घसरण झाली असून निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६७%,०.७१% घसरण झाली आहे. आज दिवसाअखेरीस निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे.ऑटो (०.८५%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.२५%), एफएमसीजी (०.२४%) निर्देशांकात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण आयटी (०.९४%), मेटल (०.६२%), रिअल्टी (०.७८%), तेल व गॅस (०.९६%) समभागात झाली आहे. ज्यामुळे अखेर बाजारातील निर्देशांकात नकारात्मक घसरणीस हे शेअर कारणीभूत ठरले.

आज सरकारने मोठ्या प्रमाणात ९९ पेक्षा अधिक वस्तू ५% जीएसटी प्रणालीत आणल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. असे असताना सुरूवातीच्या कलात ७०० ते ९०० अंकांनी वाढलेला सेन्सेक्स अखेरीस मात्र तेल व गॅस, मेटल, आयटी समभागात झा लेल्या घसरणीमुळे आज मर्यादित वाढीतच बंद झाला. आजही जीएसटी दरकपातीवर भूराजकीय अस्थिरतेच्या पगडयामुळे आज नकारात्मकता आणि तज्ञांनी म्हटल्याप्रमाणेच कंसोलिडेशन कायम राहिले. भविष्यकालीन कमाईसाठी हे शेअर महत्वाचे असले तरी या शेअर्समध्ये नफा बुकिंग गुंतवणूकदारांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आज बाटा इंडिया, एम अँड एम, नेस्ले इंडिया, ट्रेंट व ग्रासीम इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, अपोलो हॉस्पिटल अशा शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने बाजाराला सपोर्ट लेवल मिळाली असली त री देखील मारूती सुझुकी, विप्रो, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, टाटा कंज्यूमर प्रोडक्ट या समभागात झालेल्या घसरणीमुळे निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकात मर्यादीत वाढ कायम राहिली असून बँक निर्देशांकातील वाढ ही मर्यादितच राहिली.

आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ डोम इंडस्ट्रीज (७.५५%), बाटा इंडिया (७.१५%), एम अँड एम (५.९५%), नेटवेब टेक्नॉलॉजी (४.९५%), बजाज फायनान्स (४.२९%), इमामी (४.१६%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (२.९६%), अपोलो हॉस्पिटल (२.१२%), डाबर इंडिया (१.६९%), मुकुट फायनान्स (१.५३%), ग्रासीम इंडस्ट्रीज (१.०२%), टीव्हीएस मोटर्स (०.९८%), आयशर मोटर्स (०.८४%), एचडीएफसी बँक (०.७१%) समभागात वाढ झाली आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण ओला इलेक्ट्रिक (६.५१%), सारडा एनर्जी (४.५६%), एससीआय (४.४१%), टीबीओ टेक (४.१३%), जे एम फायनांशियल (३.८९%), वन ९७ (३.६६%), श्री रेणुका शुगर (३.५०%), कोफोर्ज (२.६७%), आयडीबीआय बँक (१.९४%), सिमेन्स (१.७९%), इंडसइंड बँक (१.७३%), अशोक लेलँड (१.७०%), एनटीपीसी (१.२१%), एसबीआय कार्ड (०.२८%), अदानी गॅस (०.१८%) समभागात घसरण झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'आश्वासक सुरुवातीनंतर, ऑटो, फायनान्स आणि एफएमसीजी सारख्या उपभोग-केंद्रित लाभार्थी क्षेत्रांना वगळ ता संपूर्ण बाजारपेठेत नफा बुकिंग सुरू झाल्याने देशांतर्गत बाजार जवळजवळ स्थिर राहिला. जीएसटी सुसूत्रीकरणाचे इनलाइन परिणाम आणि अमेरिकेकडून सुरू असलेल्या टॅरिफ धमक्यांचा आज बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा निर्यात गंतव्यस्थान आहे, जो जीडीपीच्या २.२% वाटा आहे, त्यामुळे त्याचे परिणाम अपरिहार्य आहेत. कंपन्या क्रॉस-कंट्री बिलिंग आणि परदेशात उत्पादन युनिट्स स्थापन करण्यासारख्या धोरणांद्वारे त्यांच्या विद्यमान ग्राहकांना निर्यात राखण्याचे मार्ग शोधत आहेत. तथापि, निर्यात मंदावण्याची आणि नवीन वाढीच्या संधींना अडथळा निर्माण होण्याची अपेक्षा आहे. उज्ज्वल बाजूने, जीएसटी दर कपातीमुळे देशांतर्गत वापराच्या मागणीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे निर्यात स्पर्धात्मकतेत घट झा ल्याच्या प्रतिकूल परिणामांना तोंड द्यावे लागेल. कापड, उपकरणे उत्पादक, धातू, ऑटो सहाय्यक, सीफूड, बासमती, दागिने, आयटी आणि फार्मा यासारख्या क्षेत्रांना अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे जी टिकाऊ वस्तू, विवेकाधीन, स्टेपल्स, हॉटेल्स, एफएम सीजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटो यासारख्या देशांतर्गत वापरात वाढ झाल्यामुळे कमी होईल.'

आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,' जीएसटी सुधारणांवरील आशावादामुळे सुरुवातीपासूनच मंदावलेल्या वाढीनंतर निफ्टीने बहुतेक वाढ रोखली. दै निक बंद २१ ईएमएच्या (Exponential Moving Average EMA) अगदी खाली होता, जो कमकुवतपणाचा सुरू असल्याचे दर्शवितो, जरी निर्देशांक संभाव्य ट्रेंड उलटण्याच्या जवळ असल्याचे दिसून येत आहे. २४७५० पातळीवरील निर्णायक पाऊल निफ्टीला २५००० पातळीपर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेली ताकद प्रदान करू शकते. २५००० पातळीवरील सततची चढउतार आणखी तेजीला चालना देऊ शकते. दुसरीकडे, पुढील दोन ते तीन दिवसांत २४७५० पातळीच्या वर बंद न झाल्यास निर्देशांकावर पुन्हा वि क्रीचा दबाव येऊ शकतो.'

आजचा शेवट गोड झाला असला तरी बाजारात अस्वस्थता मात्र अखेरच्या सत्रात जाणवली. दरम्यान तज्ञांकडून वेट अँड वॉचचा सल्ला दिला जात असल्याने निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सोमवारी लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल.पुढील दोन ते तीन दिवसांत बाजारात सेल ऑफची शक्यता अधिक आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा