दुबईतील साईभक्ताकडून तब्बल १ कोटी ५८ लाखांचे सुवर्ण दान; सोन्यात घडवली ॐ साई राम अक्षरे

अहिल्यानगर : शिर्डी साई बाबांना हैदराबादमधील आदीनारायण रेड्डी यांनी २००८ साली सुवर्ण सिंहासन दान स्वरूपात दिले होते. तेव्हापासून हेच साईबाबांना मिळालेले सर्वात मोठे दान मानले जात होते. मात्र तब्बल १७ वर्षांनंतर गुरुवारी पुन्हा एकदा साईबाबांना सर्वात मोठे सुवर्णदान दुबईतील एका साईभक्ताने अर्पण केले आहे. या भक्ताने १ किलो ६२३ ग्रॅम ६०० मिली वजनाची दोन सुवर्ण ‘ॐ साई राम’ अक्षरे देणगी स्वरुपात अर्पण केली आहेत. याची किंमत तब्बल १ कोटी ५८ लाख रुपये असून या भाविकाने गुप्तदान केले असून आपले नाव जाहीर न करण्याची विनंती साई बाबा संस्थानला केली आहे.


साई बाबांना सुवर्णदान देणारे हे दुबईतील भाविक दर महिन्याला शिर्डीत येऊन समाधीचे दर्शन घेतात. तसेच आरतीला उपस्थित राहतात. साई दर्शनानंतर ते संस्थानला न चुकता साधारण १ लाख रुपयांची देणगी अर्पण करतात. साई बाबांना सोन्याचे काहीतरी दान करावे, अशी त्यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. अखेर गुरुवारच्या पवित्र दिवशी त्यांनी दोन सुवर्ण ॐ साई राम अक्षरे अर्पण करून ती इच्छा पूर्ण केली.


दुबईतील या भाविकाने दिलेले सुवर्णदान साईबाबा संस्थानच्या वतीने समाधी मंदिरातून भाविक दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या दोन्ही द्वारांवर बसवलेले आहे. त्यामुळे मंदिरातून बाहेर पडताना भाविकांच्या मुखातून ‘ॐ साईराम’ असा जयघोष घुमतो.


या दानाविषयी माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले, ‘या भाविकाची इच्छा होती की, त्यांचे दान गुप्त राहावे. त्यामुळे त्यांचे नाव जाहीर केलेले नाही. यावेळी संस्थानच्या वतीने या भाविकाचा शाल, साईमूर्ती आणि उदी देऊन सन्मान करण्यात आला’.



दरवर्षी कोट्यवधी भाविक शिर्डीत


‘श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साई बाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दरवर्षी कोट्यवधी भाविक शिर्डीत येतात. यावेळी भाविक साई बाबांना भरभरून दान अर्पण करतात. २००८ साली आदीनारायण रेड्डी यांनी सुमारे १०० किलो सोन्याचे सिंहासन साईबाबा संस्थानला दान दिले होते. यानंतर अनेक भाविक आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर साई चरणी सोन्या-चांदीच्या वस्तू तसेच रोख स्वरुपातही दान करतात. मात्र आजचे हे सुवर्णदान २००८ नंतरचे सर्वात मोठे दान ठरले आहे,’ अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. मागील काही वर्षांत गोरक्ष गाडीलकर यांनी देश-विदेशातील भाविकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विदेशी भाविक मंदिरात किंवा परिसरात भेटले तर ते स्वतः त्यांच्याशी संवाद साधतात. शाल, साईमूर्ती आणि उदी देऊन त्यांचा सत्कार करतात. त्यामुळे भाविकांना मिळणारा हा सन्मान त्यांच्या श्रद्धेत आणि सेवाभावात भर घालणारा ठरत आहे. परिणामी साईबाबांच्या दानपेटीत विदेशी देणग्यांचीही मोठ्या प्रमाणात भर पडताना दिसत आहे.

Comments
Add Comment

राज्यात पाऊस आणि थंडीचं दुहेरी संकट; हवामान खात्याकडून १२ आणि १३ नोव्हेंबरला अलर्ट

 मुंबई : नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने धडक दिल्यानंतर आता वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय. देशभरात काही

CM Devendra Fadnavis Cabinet Mumbai : पाचव्या वित्त आयोगाला मुदतवाढ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटचे ५ महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवार) राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet) महत्त्वपूर्ण

Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या सुरक्षेत वाढ; सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पुणे : भारताची राजधानी दिल्लीमध्ये (New Delhi)  सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमुळे (Bomb

क्रिकेटच्या वादातून गोळीबारात तरुणाचा मृत्यू

जळगाव : शहरातील कांचन नगरातील विलास चौकात क्रिकेटच्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. आकाश

पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव

पुणे : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा

ठोंबरे आणि मिटकरींना पक्षातून 'दे धक्का', प्रवक्ते पदावरून उचलबांगडी!

सूरज चव्हाण यांना मात्र 'अभय'; राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादाला नवे वळण मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस