Thursday, September 4, 2025

New GST Rates : दिवाळी धमाका ऑफर सरकारकडूनच! आता खर्च कमी, मजा जास्त; पनीर, दूध, औषधं आणि शालेय साहित्य जीएसटीमुक्त, ही संपूर्ण यादी वाचा

New GST Rates : दिवाळी धमाका ऑफर सरकारकडूनच! आता खर्च कमी, मजा जास्त; पनीर, दूध, औषधं आणि शालेय साहित्य जीएसटीमुक्त, ही संपूर्ण यादी वाचा

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत (GST Council Meeting) कर संरचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. याआधी वस्तू व सेवाकरात (GST) ५%, १२%, १८% आणि २८% असे एकूण चार करस्लॅब अस्तित्वात होते. मात्र सरकारने यापैकी १२ टक्के आणि २८ टक्क्यांचे स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता देशात केवळ दोनच स्लॅब – ५% आणि १८% लागू असतील. या बदलाचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार असून, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यांसारख्या दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट हलके होणार आहे. याशिवाय, आरोग्य विमा व जीवन विमा क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळणार असून त्यावर करमुक्तीची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय २२ सप्टेंबरपासून, म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून अंमलात येणार आहे. त्यामुळे आगामी सणावारात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे, तसेच व्यापाऱ्यांनाही करप्रक्रिया सोपी होऊन व्यवसाय सुलभ होणार आहे.

नवी दिल्लीमध्ये झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या महत्त्वाच्या बैठकीत सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारे मोठे निर्णय घेण्यात आले. यापूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी रचनेत मोठे बदल होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. बैठकीत देशात लागू असलेल्या १२ टक्के आणि २८ टक्क्यांच्या करस्लॅब रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यामुळे कर संरचना अधिक सोपी होणार आहे. यापुढे ज्या वस्तूंवर २८ टक्के जीएसटी आकारला जात होता, त्या वस्तूंवर आता केवळ १८ टक्के कर आकारला जाईल. त्याचप्रमाणे, ज्या वस्तूंवर आधी १२ टक्के कर लागू होता, त्या वस्तूंवर आता फक्त ५ टक्के जीएसटी लागणार आहे. याशिवाय, काही निवडक वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करून शून्य टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू स्वस्त होणार असून, ग्राहकांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसेच व्यापार व उद्योग क्षेत्रालाही करप्रणाली सुलभ झाल्यामुळे फायदा होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

खा, प्या आणि निर्धास्त राहा! पुढील वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी

आरोग्य आणि औषधे

  • जीवणविमा
  • आरोग्य विमा
  • ३३ जीवनरक्षक औषधे
  • गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरील औषधे

    शैक्षणिक साहित्य

  • पेन्सिल
  • शार्पनर
  • क्रेयॉन्स
  • खोडरबर
  • वह्या
  • नकाशे
  • चार्ट
  • ग्लोब

पुढील वस्तूंवर ५ टक्के जीएसटी

खाद्यपदार्थ

  • दूध
  • पनीर
  • पराठा / परोटा
  • खाकरा
  • चपाती
  • तंदूर रोटी
  • पिझ्झा

वाहन आणि शेतीसंबंधी साधनं

  • इलेक्ट्रिक गाड्या
  • ट्रॅक्टर व त्यांचे टायर्स
  • ट्रॅक्टरचे सुटे भाग
  • जलसिंचन व तुषारसिंचनाची उपकरणे
  • कृषी उपकरणे
  • कृषी फवारणी औषधे

स्वच्छता आणि वैयक्तिक वापर

  • केसांचे तेल
  • शाम्पू
  • टूथपेस्ट
  • टूथ ब्रश
  • स्नानासाठी साबण
  • दाढीचे साबण

दुग्धजन्य पदार्थ आणि खाद्यपदार्थ

  • बटर
  • तूप
  • चीज
  • पाकिटातील नमकीन
  • भुजिया
  • मिक्श्चर

बाळसंबंधी वस्तू

  • बाळाची दुधाची बाटली
  • डायपर
  • नॅपकिन्स

आरोग्य व वैद्यकीय साहित्य

  • थर्मोमीटर
  • ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स
  • चष्मे
  • रोगनिदानासाठी लागणारी उपकरणे

घरगुती साधने

  • शिलाई मशीन आणि तिचे सुटे भाग

Comments
Add Comment