दादर परिसरातील कबुतरांचे अन्यत्र स्थलांतर!

  16

सोलो इमारत, पिंपळाच्या झाडांवरील वास्तव्य कमी


लोकांच्या अंगावर होणारा विष्ठेचा अभिषेकही थांबला


मुंबई : मुंबईतील कबुतर खाना बंद करण्याच्या न्यायालयाच्या निर्देशानंतर दादरसह अनेक भागांमधील कबुतरखाने आच्छादित करून बंद करण्यात आले आहेत. दादर पश्चिम येथील कबुतर खाना अशाचप्रकारे ताडपत्रींनी आच्छादल्यानंतर येथील दाणापाणी बंद झाल्यानंतर येथील कबुतरांनी आता ही जागा सोडल्याचे पहायला मिळत आहे. येथील कबुतरांचे रात्रीच्या वेळी येथील सोलो इमारतीवर वास्तव्य असायचे तसेच दिवसा येथील पिंपळाच्या झाडांवर आणि जैन मंदिराच्या कौलांवर असायचे. पण मागील काही दिवसांपासून दिवसा आणि रात्रीही याठिकाणी कबुतर दिसण्याचे प्रमाण कमी झाले असून खुद्द विक्रेत्यांनीही झाडांवरुन होणाऱ्या अभिषेकाचे प्रमाण कमी झाल्याने आता छत्री न लावताही व्यवसाय करता येत असल्याचे मान्य केले.


मुंबईतील दादर कबुतरखाना हा न्यायालयाच्या निर्देशानंतर ते याठिकाणी जैन बांधवांनी केलेले आंदोलन यामुळे चांगला प्रसिध्दीला आला आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने हा कबुतर खाना बंद करण्यासाठी सर्व प्रथम यांची स्वच्छता केल्यानंतर ताडपत्रींनी आच्छादून ते बंद केले होते. परंतु जैन समुदायाने आक्रमक होत बंदिस्त केलेली ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पालिकेने हा कबुतर खाना कायमस्वरुपी बंद केला आहे. तेव्हापासून हा कबुतर खाना बंद असून याठिकाणी दाणे टाकणे बंद झाल्याने आता येथील कबुतरांनी अन्नाच्या शोधात अन्य जागी स्थलांतर केल्याचे दिसून येत आहे.


या दादर पश्चिम कबुतरखाना परिसरातील कबुतरांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली असून आहे. अनेक वर्षांपासून संध्याकाळनंतर कबुतरखाना आणि त्याच्या आसपासच्या सोलो इमारतीच्या छज्जा आणि गॅलरीवर बसलेल्या दिसायचे तसेच येथील पिंपळाच्या झाडांवर त्यांचे वास्तव्य असायचे. पण या दोन्ही ठिकाणी आता ही हजारो कबुतरे दिसून येत नसून त्यांनी आता अन्यत्र स्थलांतर केल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे कबुतरांना दाणापाणी मिळणे बंद झाले असून, त्यांचे वास्तव्य आता या ठिकाणाहून इतरत्र स्थलांतर केले असावे असे बोलले जात आहे.


येथील पिंपळाच्या झाडाखाली व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी याठिकाणी छत्री लावूनच व्यवसाय करावा लागत होता. आम्हाला व्यवसायच काय तर या झाडाखालून जाणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर कबुतराची विष्ठा पडली जायची आणि अनेकजण या रस्त्यावरुन जाणे टाळायचे. पण आता कबुतर खाना बंद झाल्यापासून आम्हाला छत्री लावून व्यवसाय करण्याची गरज भासत नाही. एवढेच कायतर आम्ही आता बिनधास्तपणे झाडाखाली बसू शकतो. मागील काही दिवसांपासून कबुतर दिसणेही बंद झाले आहे. कबुतरखाना बंदिस्त केला असला तरी त्यावर एखाद दुसरे कबुतर दिसते, पण मोठ्याप्रमाणात कबुतर दिसणे बंद झाल्याचे येथील चावीवाल्या विक्रेत्यांचे तसेच अन्य वस्तू विक्रेत्या फेरीवाल्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

सिक्रेट लॉकचा पर्दाफाश; हायवेलगतच्या टार्जन डान्सबारवर पोलिसांची धडक कारवाई, ५ बारबालांची सुटका

मुंबई : पनवेलसह मुंबईत डान्सबार सर्रास सुरू असल्याची अनेकदा प्रकरणं समोर आली आहेत. काही महिन्यांपूर्वी तर थेट

Mumbai High Court: बाणगंगेत गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन नाही, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मुंबई: बाणगंगा तलावात पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन करू देण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

जीएसटी स्लॅब बदलांमुळे दिलासा : एकनाथ शिंदे

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रचनेतील ताज्या बदलांना

भुजबळांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील बहिष्कारावर मुख्यमंत्र्यांचं सर्वात मोठं विधान

"जोपर्यंत हे राज्य आहे, तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही.":  मुख्यमंत्री मुंबई:

टायगर मेमनच्या नातेवाईकांचा फ्लॅटवरील हक्क कोर्टाने फेटाळला

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेमनच्या नातेवाईकांनी दाखल केलेली याचिका

Pankaja Munde on Maratha reservation :  “ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही; मराठा आरक्षणावर पंकजा मुंडेंची ठाम भूमिका”

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता यश मिळालं आहे. आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सातत्यपूर्ण