Thursday, September 4, 2025

Gold Rate: पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर जीएसटी कपातीसह सोन्यातही घसरण !

Gold Rate: पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर जीएसटी कपातीसह सोन्यातही घसरण !

मोहित सोमण: आज सोन्याच्या निर्देशांकात अखेर घसरण झाली आहे. सलग पाच दिवस सोन्यात तेजी दिसल्याने बाजारात सोने प्रचंड मोठ्या प्रमाणात महागले होते. आज अखेर सोन्याच्या दरात ग्राहकांना किरकोळ दिलासा मिळाला आहे. भूराजकीय अस्थिरते चा फटका या संपूर्ण आठवड्यात बसला होता. अमेरिकेतील संभाव्य व्याज दरकपात व रशिया युक्रेन युद्ध बोलणी या दोन कारणांमुळे कमोडिटीतील मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने सोन्याला सराफा बाजारात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच आज जीएसटीत कपात झाल्याने सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे. सोने आणि चांदीवरील जीएसटी दर ३% आणि दागिने बनवण्याच्या शुल्कावर ५% राहणार असले तरी सामान्य वस्तूंवरील कर कपातीचा थेट परिणाम गुंतवणूकदार आणि खरेदीदारांच्या खिशावर झाला आहे. जीएसटी कपाती मुळे बाजारातील किमती कमी झाल्या आहेत आणि विशेषतः सणासुदीच्या काळात सामान्य लोकांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी १०६ ८६ रूपये, २२ कॅरेटसाठी ९७९५ रूपये, १८ कॅरेटसाठी ८०१४ रूपये आहे. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ११० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ९० रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १०६८६० रूपये, २२ कॅरेटसाठी ९७०५० रूपये, १८ कॅरेटसाठी ८०१४० रूपयांवर पोहोचली आहे.

आज मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १०६८६ रूपये, २२ कॅरेटसाठी ९७९५ रूपये, १८ कॅरेटसाठी ८११० रूपये आहे. जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.१२% वाढ झाली आहे. तर जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.५८% घसरण झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ३५३९.२० औंसवर गेली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याच्या निर्देशांकात ०.८४% घसरण झाली असून दरपातळी १०६२९५ रूपयांवर गेली आहे. जीएसटी कपातीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने बाजारात गुंतवणूकदारांना आगामी काळात आश्वासकता वाटते.

एमसीएक्स म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, ऑक्टोबर फ्युचर्समध्ये सोन्याचा भाव १.२१% ने घसरून १,०५,८९७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीचा डिसेंबर फ्युचर्स देखील १.६% ने घसरून १,२३,८७१ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता. याचा अर्थ अ सा की गुंतवणूकदारांनी अस्थिरतेत सोन्यातील गुंतवणूकीचा आधार घेतला असून बाजारात सकारात्मक भावना कायम आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा