Thursday, September 4, 2025

मुंबईत ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल

मुंबईत ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मुस्लिमांना ईद-ए-मिलाद सणाची सुटी शुक्रवार पाच सप्टेंबर २०२५ ऐवजी सोमवार आठ सप्टेंबर २०२५ रोजी मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिसूचना काढली आहे.

महाराष्ट्र शासनाने २०२५ साठी राज्यासाठी २४ सार्वजनिक सुट्या डिसेंबर २०२४ मध्येच जाहीर केल्या आहेत. जेव्हा सुट्यांची घोषणा अधिसूचित करण्यात आली त्यावेळी ईद-ए-मिलादची सुटी संपूर्ण राज्यासाठी शुक्रवार पाच सप्टेंबर २०२५ या दिवशीच जाहीर करण्यात आली होती. पण यंदा मुंबई शहर आणि उपनगरात मुस्लिमांना ईद-ए-मिलाद सणाची सुटी शुक्रवार पाच सप्टेंबर २०२५ ऐवजी सोमवार आठ सप्टेंबर २०२५ रोजी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार ५ सप्टेंबर २०२५ ची ईदची सुटी कायम ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने विशेष अधिकाराचा वापर करुन सुटीत बदल केला आहे.

ईदचा सण उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात साजरा करावा. तसेच या आनंद सोहळ्यात अफवा पसरवून शांतता भंग करणाऱ्यांची माहिती पोलिसांना तत्काळ द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

ईद-ए-मिलाद हा धार्मिक सण मुस्लिम मोठ्या संख्येने एकत्र जमून साजरा करतात. यानिमित्ताने जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पण ६ सप्टेंबर २०२५ रोजी रविवारी अनंत चतुर्दशी हा हिंदू सण आहे. यामुळेच मुंबई शहर आणि उपनगरात मुस्लिमांना ईद-ए-मिलाद सणाची सुटी शुक्रवार पाच सप्टेंबर २०२५ ऐवजी सोमवार आठ सप्टेंबर २०२५ रोजी देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा