

New GST Rates : दिवाळी धमाका ऑफर सरकारकडूनच! आता खर्च कमी, मजा जास्त; पनीर, दूध, औषधं आणि शालेय साहित्य जीएसटीमुक्त, ही संपूर्ण यादी वाचा
नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या जीएसटी परिषदेच्या ...
अजित पवारांना ओळखलं नाही...
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या मुरूम उत्खननाच्या तक्रारीनंतर पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा घटनास्थळी दाखल झाल्या. या कारवाईदरम्यान त्यांची ग्रामस्थांशी शाब्दिक वादावादी झाली. त्याच वेळी काँग्रेसचे आमदार बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट फोन लावून तो अंजली कृष्णा यांच्याकडे दिला. फोनवर पवारांनी स्वतःची ओळख करून देत कारवाई तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले. मात्र, अंजली कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही. यामुळे नाराज झालेल्या पवारांनी कठोर शब्दांत म्हणाले – "मैं डीसीएम अजित पवार बोल रहा हूं, कारवाई बंद करो, मेरा आदेश है."अंजली कृष्णा यांनी पवारांना थेट उत्तर देत, "मेरे फोन पर कॉल करो" असे सांगितल्यावर अजित पवार अधिकच संतापले. त्यांनी कठोर शब्दांत इशारा देत म्हटले – "तुम पे अॅक्शन लुंगा, इतनी डेरिंग है तुम्हारी? मेरा चेहरा तो पहचानोगी ना?" यानंतर पवारांनी वेळ न दवडता व्हिडिओ कॉल सुरू केला. हा कॉल लागताच अंजली कृष्णा थेट बांधावर बसलेल्या अवस्थेत पवारांशी संवाद साधताना दिसल्या. या संभाषणादरम्यान पवारांनी स्पष्टपणे कारवाई तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे, तर "माझा फोन आलाय, हे तहसीलदारांना सांगा," असे सांगून त्यांनी अधिकार्यांनाही आपला आदेश कळविण्याचे निर्देश दिल्याचे ऐकू आले. दरम्यान, उपस्थित ग्रामस्थांनी सुरु असलेले मुरूम उत्खनन हे ग्रामपंचायतीच्या परवानगीने होत असल्याचा दावा केला. मात्र, त्यांनी आपल्या म्हणण्याचा कोणताही ठोस पुरावा किंवा कागदपत्रं दाखवली नाहीत. त्यामुळे परवानगी वैध असल्याचे सिद्ध न झाल्याने पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा, या महिला आयपीएस अधिकाऱ्यांनी उत्खननाविरुद्धची कारवाई सुरूच ठेवली.करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही. त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ काॅलच केला.#ajitpawar #AnjaliKrishna pic.twitter.com/ag2DNuf3do
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 2, 2025