Thursday, January 1, 2026

लग्नासाठी धारावीला तरुणींची नापसंती

लग्नासाठी धारावीला तरुणींची नापसंती
मुंबई: धारावीत राहणाऱ्या, लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरूणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. मुळात ही धक्कादायक माहिती धारावीत कार्यरत असलेले अनेक वधू-वर सूचक मंडळं अर्थात मॅरेज ब्यूरोद्वारे देण्यात आली आहे. धारावीतील तरुणांना लग्न जोडीदार शोधण्यात अडचणी येत आहेत. सामाजिक कलंक आणि धारावीची वाईट प्रतिमा यामुळे गावातील किंवा शहरातील मुली लग्न करण्यास नकार देतात. स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव हे देखील त्याचे प्रमुख कारण आहे.
Comments
Add Comment