
मोहित सोमण: भारतीय स्पर्धा आयोगाने (Competition Commission of India CCI) येस बँकेतील २४.९९% भागभांडवल खरेदी करण्यासाठी जपानच्या सुमीटोमो मितसुई बँकिंग कॉर्पोरेशनला (Sumitomo Mitsui Banking Corporation) परवानगी दिल्यानंतर येस बँकेचा शेअर ३.६३% उसळला आहे. दुपारी १.५२ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ३.६३% उसळी घेतल्याने सध्या शेअर २०.२६ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.उपलब्ध माहितीनुसार, येस बँकेच्या शेअरची किंमत एका महिन्यात ५% वाढली आणि तीन महिन्यांत १६% घसरली असून हा शेअर इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) शेअर स्थिर राहिला आहे. एका वर्षात तो १८% घसरला आहे. गेल्या दोन वर्षांत, येस बँकेचे शेअर १३% वाढले आहेत, तर पाच वर्षांत ते ३५% वाढले आहेत.
मागील महिन्यातच सेंट्रल बँक असलेल्या आरबीआयने (RBI) या प्रस्तावाला मान्यता दिली होती. येस बँकेच्या एकूण भागभांडवलात २४.९९% पूर्णपणे भरलेले भागभांडवल (Paidup Capital) व वोटिंग राईट्सह मान्यता दिली होती. त्यामुळे आता या खरेदीसाठी एसएमबीसीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. एसएमबीसी (Sumitomo Mitsui Banking Corporation) हा जपानमधील दुसऱ्या क्रमांकाची बँकिग संस्था गणली जाते. त्यामुळे हे भारतातील मोठा व्यवहार मानला जात आहे. याशिवाय येस बँकेच्या भागभांड वल खरेदीमुळे कंपनीला भारतातील आपल्या क्षेत्रीय विस्तारासाठी जापनीज संस्थेला संधी मिळाली आहे.
एसएमबीसी ही सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुप, इंक. (एसएमएफजी) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. एसएमएफजी हा जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बँकिंग गट आहे, ज्याची डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण मालमत्ता २ ट्रिलियन डॉलर्स होती आणि जागतिक स्तरावर त्याची उपस्थिती मजबूत आहे.'प्रस्तावित संयोजन सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (एसएमबीसी) द्वारे येस बँकेच्या शेअर भांडवलाच्या आणि मतदानाच्या अधिकारांच्या संपादनाशी संबंधित आहे'असे भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसी आय) आपल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ९ मे २०२५ रोजी येस बँकेने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) कडून १३.१९% हिस्सा आणि अॅक्सिस बँक, बंधन बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि कोटक महिंद्रा बँक यासह इतर सात भागधारकांकडून ६.८१% हिस्सा खरेदी करून कर्जदात्यामध्ये २०% हिस्सा घेण्याच्या एसएमबीसीच्या प्रस्तावित संपादनाची माहिती माध्यमांना दिली होती. या व्यवहारानंतर एसएमबीसी मुंबईस्थित येस बँकेचा सर्वात मोठा भा गभांडवल धारक बनणार आहे. मंगळवारी, बीएसईवर येस बँकेच्या शेअरची किंमत ०.०५% वाढून १९.५६ वर बंद झाली. आज मात्र बँकेच्या शेअरमध्ये ३% पेक्षा अधिक वाढ झाली आहे.