
मोहित सोमण:विक्रान इंजिनिअरिंग लिमिटेडने (Vikran Engineering Limited) कंपनीचा शेअर आजपासून बाजारात सूचीबद्ध (Listed) झाला आहे. कंपनीच्या शेअरला बाजारात पहिल्या दिवशी निराशा पत्करावी लागली. कंपनीचा आयपीओ पूर्णपणे सब स्क्राईब झाला असला तरी कंपनीच्या शेअरला पहिल्या दिवशी थंड प्रति साद मिळाला आहे. किंबहुना सूचीबद्ध किंमतीपेक्षाही शेअर बाजारात घसरला आहे. सकाळी कंपनीचा शेअर ९९ रूपयांना सूचीबद्ध झाला होता. बाजाराच्या सुरूवातीला केवळ ९९.७० रू पयांवर शेअर व्यवहार करत होता. दुपारी १.३६ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर ५ रूपयांनी घसरत ९४.७० रुपयांवर व्यवहार करत होता.
विक्रान इंजिनिअरिंग ही एक वेगाने वाढणारी इंजिनिअरिंग, प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (EPC) फर्म आहे जी डिझाइन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंगसह एंड-टू-एंड टर्नकी सोल्यूशन्स देते. पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करत कंपनी आपल्या सेवा देते. आयपीओच्या आधी, कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून २३१.६ कोटी रुपये उभारले होते ज्यामध्ये बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंड, आयटीआय एमएफ, सॅमको एमएफ, एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि सोसायटी जनरल यासारख्या मो ठ्या गुंतवणूकदारांचा सहभाग होता.
आयपीओमध्ये ७२१ कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणि प्रमोटरने ५१ कोटी रुपयांचा ऑफर-फॉर-सेल (OFS) समाविष्ट होता. विक्रान इंजिनिअरिंगची आयपीओतून मिळालेल्या नवीन उत्पन्नातून ५४१ कोटी रुपये खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाप रण्याची योजना आहे, तर उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरली जाईल असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले होते.
खरं तर कंपनीचा आयपीओ पूर्णपणे सबस्क्राईब झाल्यानंतर कंपनीचा शेअर चांगल्या प्रिमियम दरात सूचीबद्ध होईल अशी गुंतवणूकदारांची व तज्ञांची अपेक्षा होता. मात्र केवळ ७% प्रिमियम दराने जीएमपी (Grey Market Price) असलेल्या शेअरला सूचीबद्ध झाल्यानंतर पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. ७२२ कोटीचा हा आयपीओ २६ ते २९ ऑगस्टपर्यंत बाजारात दाखल झाला होता. कंपनीने प्राईज बँड ९२ ते ९७ रूपये प्रति शेअर निश्चित केला होता. असे असताना कंपनीच्या शेअरला बाजारात पहिल्या दिवशी निराशा पत्करावी लागली आहे.