Wednesday, September 3, 2025

TBO Tek कंपनीचा शेअर सुसाट थेट १५% उसळला 'या' कारणामुळे

TBO Tek कंपनीचा शेअर सुसाट थेट १५% उसळला 'या' कारणामुळे

मोहित सोमण:टीबीओ टेक (TBO Tek Limited) कंपनीच्या शेअर आज १५% इतक्या मोठ्या अंकाने उसळला आहे. सकाळी १२.४७ वाजेपर्यंत १३.३४% उसळल्याने दरपातळी १५६६.९ रूपये प्रति शेअरवर पोहोचली आहे. सकाळी सत्र सुरू झाल्यावरच शे अर ११-१३% पर्यंत उसळला होता. कंपनीने युएस स्थित कंपनी क्लासिक व्हेकेशन कंपनीचे अधिग्रहण केल्याने गुंतवणूकदारांनी या शेअरला मोठा प्रतिसाद दिला आहे. क्लासिक व्हेकेशन (Classic Vacation) ही B2B, B2C लक्झरी ट्रॅव्हल कंपनी आहे. युनाय टेड स्टेट्समध्ये स्थित असलेल्या कंपनीने टीबीओ टेकने अधिग्रहण केल्याची बातमी येताच आज सकाळीच शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. या क्लासिक व्हेकेशनचे माहितीनुसार भारतात १०००० पेक्षा अधिक प्रवास सल्लागार (Trip Advisors) कार्यरत असल्याने ही मोठी कंपनी पर्यटन क्षेत्रातील मानली जाते. अशातच टीबीओ टेक स्वतः ट्रॅव्हल वितरणात (Travel Distribution) व्यावसायात गुंतल्याने टीबीओ टेक कंपनीच्या पर्यटन सेवा पोर्टफोलिओमध्ये मोठी वाढ झाली आहे. टीबीओ टेकवर विमान बुकिंग, हॉटेल बु किंग, क्रुझ, रेल्वे, पर्यटन, व तत्सम प्रकारच्या सेवा मिळतात. त्यामुळे कंपनीने या अधिग्रहणातून लक्झरी सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा टीबीओटेकचा विस्तार महत्वाचा ठरू शकेल. याशिवाय क्लासिक व्हेकेशन कंपनीचे अधिग्रहण टीबीओटेकला उत्तर अमेरिके त आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी मदतगार ठरू शकते.

या अधिग्रहणावर TBO ने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की,'या अधिग्रहणामुळे TBO च्या पहिल्या दर्जाच्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मची आणि जगभरातील इन्व्हेंटरीची ताकद आणि क्लासिक व्हेकेशनच्या लक्झरी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझर्स आणि पुरव ठादारांच्या विशाल नेटवर्कची जोड मिळते. क्लासिक व्हेकेशनने ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात $१११ दशलक्ष महसूल आणि $११.२ दशलक्ष ऑपरेटिंग ईबीटा ( करपूर्व कमाई EBITDA) मिळवला. प्रीमियम आउटबाउंड ट्रॅव्हल मार्केटमध्ये सेवा देण्यासाठी TBO चा विस्तार क्लासिक व्हेकेशनच्या विशेष B2B ब्रँड आणि एलिट, उच्च-मूल्य (High Worth) सल्लागार नेटवर्कशी सामंजस्यपूर्ण आहे, जे त्यांच्या जवळजवळ पाच दशकांच्या यशाने आणि ब्रँड ओळखीने वाढले आहे असेही यावेळी कंप नीने म्हटले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, टीबीओ टेक आणि क्लासिक व्हेकेशनच्या ऑपरेशन्समधील हा पुढचा टप्पा दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित ताकदीचा फायदा घेईल. ग्राहक, पुरवठादार आणि कर्मचाऱ्यांसाठी सातत्य सुनिश्चित करताना लक्झरी ट्रॅव्हल मार्केटचा जागतिक नेता म्हणून वाढ वाढवेल. येत्या दशकात लक्झरी ट्रॅव्हलची जागतिक मागणी लक्षणीयरीत्या वाढण्याची अपेक्षा असल्याने, ही भागीदारी प्रवाशांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि शाश्वत मूल्य वाढवण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ तयार करते. आमच्या अलि कडच्या आयपीओ, अल्पसंख्याक गुंतवणूक बँकिंग आणि चालू असलेल्या मॅक्रो-इंडस्ट्री टेलविंड्समधून मिळालेल्या मजबूत तरलतेमुळे, कंपनी जागतिक बी२बी प्रवास वितरणात आघाडीवर म्हणून शाश्वत, फायदेशीर वाढीसाठी सज्ज आहे, असे टीबीओने आप ल्या निवेदनात म्हटले आहे.

या धोरणात्मक निर्णयावर प्रतिकिया देताना,'आमच्या कंपनीच्या प्रवासातील या पुढील टप्प्यासाठी आम्ही उत्सुक आहोत टीबीओचे तंत्रज्ञान-केंद्रित उपाय पूर्णपणे आमच्या प्रवास सल्लागार समुदायासाठी सज्ज आहेत.' असे क्लासिक व्हेकेशन्सच्या सीईओ मे लिसा क्रूगर म्हणाल्या आहेत. टीबीओ टेक कंपनीचा शेअर में २०२४ मध्ये बाजारात सूचीबद्ध (Listed) झाला होता. त्यावेळी इक्विटी शेअरची मूळ किंमत ९२० रूपये प्रति शेअर होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >