
मोहित सोमण: आज शेअर बाजाराने युटर्न मारत मोठी वाढ नोंदवल्याने बीएसईत एकाच दिवसात गुंतवणूकदारांची ३ लाख कोटींची कमाई झाली आहे. आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर वाढीने झाल्याने सेन्सेक्स ४०९.८३ अंकाने उसळत ८०५६७.७१ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी १३५.४५ अंकाने उसळत २४७१५.०५ पातळीवर स्थिरावला आहे. अखेरीस सेन्सेक्स बँक निर्देशांक ४२५.३७ अंकाने उसळला असून बँक निफ्टी ४०६.५५ अंकांने वाढला आहे. आज अखेरच्या सत्रातही मिडकॅप व स्मॉलकॅपम ध्ये वाढ झाल्याने बाजाराला सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली आहे. सकाळी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने सकाळी गिफ्ट निफ्टीतील वाढीनंतरही सुरूवातीच्या कलात बाजारात घसरण झाली होती. जीएसटी बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लाग ल्याने बाजारात धाकधूक कायम होती. मात्र बैठकीस सुरूवात झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी बाजारातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवल्याची शक्यता असल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतली तरी ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्ये वाढ झाल्याने अखेर निर्देशांकात वाढ झाली आहे.
सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६३%,०.९०% वाढ झाली आहे तर निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.६५%,०.८९% वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) मध्ये अखेरच्या सत्रात आयटी (०.७४%), मिडिया (०.०४ %), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.३८%) निर्देशांकात घसरण झाली असून इतर निर्देशांकात वाढ झाली आहे. अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ, मेटल (३.११%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (१.१६%), मिडस्मॉल हेल्थकेअर (१.५३%), हेल्थकेअर (१.०८%), पीएसयु बँक (१.०३%), ऑटो (०.७४%) निर्देशांकात वाढ झाली आहे.
आज जीएसटी काऊन्सिल बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाल्याने आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सततच्या सुरू असलेल्या सेल ऑफमुळे निर्देशांकात घसरण होत होती. मात्र बँक, फायनांशियल सर्विसेसमुळे बाजारात स्थिरता प्राप्त झाली आहे. दुसरीकडे एचएसबीसी सेवा पीएमआय निर्देशांकातली झालेल्या उच्चांकी वाढीमुळे बाजारातील अपेक्षा वाढल्या आहेत. याशिवाय फार्मा शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या वाढीसह डोनाल्ड ट्रम्प यांच्या २००% टॅरिफ धमकीनंतरही फार्मास्युटिकल क्षे त्रातील शेअर्समध्ये वाढ झाली जी बाजाराला फलदायी ठरली आहे. यासह टाटा स्टील, हिंदाल्को, जेएसडब्लू स्टील, कोल इंडिया, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या हेवीवेट शेअर्समध्ये वाढ झाल्याने आज बाजाराला फायदा झाला असून नेस्ले इंडिया, इन्फोसिस, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, एनटीपीसी, विप्रो अशा मोठ्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने मोठी रॅली अधुरी राहिली आहे.
आज दिवसभरात सोन्याच्या निर्देशांकातही वाढ युएस मधील अस्थिरतेमुळे कायम राहिली आहे. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.४६% वाढ झाली आहे. आज डॉलर निर्देशांकात (DXY) कुठलाही बदल झाला नसला तरी आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ झाल्याने सोन्याला आज सपोर्ट लेवल मिळाली असून सोन्यात त्यामुळे किरकोळ वाढ कायम राहिली आहे. कच्च्या तेलाच्या बाबतीत आज कच्च्या तेलाच्या निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. आगामी ओपेक राष्ट्रांच्या बैठकीवर गुंतवणूकदारांचे लक्ष लागल्याने तसेच मागणीत झालेली घसरण, रशिया व युएस यांच्यातील तोडगा निघण्याची शक्यता नसली तरी आगामी काळात वाटाघाटी होऊ शकते या आशावादामुळे आज तेलात घसरण झाली आहे.या आठवड्याच्या शेवटी पेट्रोलियम नि र्यातदार देशांच्या संघटनेच्या आणि त्यांच्या सहयोगी देशांच्या ज्याला सामान्यतः OPEC+ म्हणून ओळखले जाते त्या बैठकीवर बाजारपेठेचे गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित होते, जिथे यावर्षी अनेक वाढीनंतर हा गट उत्पादन कोटा अपरिवर्तित ठेवेल अशी अपेक्षा आहे.
ओपेकने (OPEC)+ ने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत उत्पादन लक्ष्यात दररोज सुमारे २.२ दशलक्ष बॅरल वाढ करण्याचे आणि युएईसाठी ३००००० बॅरल प्रतिदिन तेलाच्या कोटमध्ये वाढ करण्याचे म्हटले आहे. तरीही बाजारपेठ तुलनेने घट्ट राहिली आहे कारण काही देश अधिक तेल पंप करण्यासाठी संघर्ष करत आहेत आणि काहींना OPEC+ द्वारे पूर्वी त्यांच्या कोट्यापेक्षा जास्त उत्पादन केल्यानंतर उत्पादनावर लगाम लावण्यास सांगितले जात आहे. त्यामुळेच तेल आज उच्चांकावरून मोठ्या प्रमाणात निचांकी पातळी वर घसरले.
आज अखेरच्या सत्रापर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात २.२३% घसरण झाली असून Brent Future निर्देशांकात १.७९% घसरण झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात एस अँड पी ५०० (०.६९%),नासडाक (०.८२%) बाजारात घसर ण झाली असून डाऊ जोन्स (०.००%) पातळीवर राहिला आहे. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात तैवान वेटेड (०.३५%), कोसपी (०.३८%), सेट कंपोझिट (०.८४%), जकार्ता कंपोझिट (१.०७%) निर्देशांकात झाली असून घसरण निकेयी २२५ (०.९१%), शां घाई कंपोझिट (१.१७%), स्ट्रेट टाईम्स (०.२१%) बाजारात झाली आहे.आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ टीबीओ टेक (१५.०८%), नेटवेब टेक्नॉलॉजी (११.४८%), ओला इलेक्ट्रिक (११.३५%), एनएमडीसी स्टील (९.६१%), पिरामल फार्मा (७.७४%), टाटा स्टील (५.९७%), जिंदाल स्टील (५.४६%), इंडिया सिमेंट (४.८४%), सेल (५.३५%), तेजस नेटवर्क (४.५४%), जीएमडीसी (४.५३%), ग्लेनमार्क फार्मा (४.४६%), होंडाई मोटर्स (२.३७%), टाटा मोटर्स (१.१२%), एचडीएफसी बँक (१.०५%) समभागात झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण जेके सिमेंट (३.४१%), फिनिक्स मिल्स (३.४०%), इंटलेक्ट डिझाईन (३.३३%), ई क्लर्क सर्विसेस (२.७९%), आदित्य बिर्ला फॅशन (२.२९%), एमआरएफ (२.१७%), झेंसर टेक्नॉलॉजी (१.८२%), इन्फोसिस (१.३१%), एचडीएफ सी लाईफ इन्शुरन्स (०.७०%), एनटीपीसी (०.६१%), नेस्ले इंडिया (०.५१%) समभागात घसरण झाली आहे.
आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार विश्लेषक अजित भिडे म्हणाले आहेत की,'चीनने स्टीलचे उत्पादन कमी करण्याची बातमी समोर आली आणि आपला बाजार आज मेटलच्या थीमवर स्वार झाला. अमेरिकेत औ षधांचा तुटवडा जाणवायला लागला आहे.आज दोन महिन्यांत भारताची अमेरिकेत निर्यात थांबली आहे. त्याचे प्रेशर ट्रम्पवर दिसत आहे.म्हणून फार्मावर टॅरिफ २००% ची धमकी देत आहे. तसेच युरोपियन देशांनाही भारताबाबत भडकावत आहे.अमेरिकेत ट्रम्पवि रोधी वातावरण न्यायालयाचे निरीक्षक या सर्व घटनांमुळे बाजार हळूहळू पुर्व पदावर येत असल्याचे दिसत आहे.तसेच विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री थोडी कमी झाली आहे. जीएसटीच्या मिटींगकडे सर्व लक्ष लागलं आहे. आज टाटा स्टील,जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को कोल इंडिआ,रिलायन्स वगैरे मध्ये चांगली वाढ पहायला मिळाली आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'जीएसटी स्लॅबच्या सुसूत्रीकरणामुळे उपभोग-केंद्रित प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा असल्याने सत्राच्या संमिश्र सु रुवातीनंतर भारतीय शेअर बाजारांनी तेजी दर्शविली. विवेकाधीन, टिकाऊ आणि स्टेपलसारख्या ग्राहक-आधारित क्षेत्रांच्या सर्व श्रेणींनी चांगली कामगिरी केली. दरम्यान, सोन्याने जागतिक बाजारपेठेत आपली तेजी नवीन उच्चांकावर नेली, ज्यामुळे अमेरिकेच्या दीर्घकाळाच्या शुल्कांबद्दल आणि जागतिक वाढीवर आणि भू-राजकीय बदलांवर त्यांचा संभाव्य परिणाम याबद्दल सततच्या चिंतांमुळे गुंतवणूकदारांची सावधगिरी दिसून येते. नजीकच्या काळात, बाजारातील भावना जीएसटी कौन्सिलच्या बैठकीच्या निकालावर अवलंबून आहे, ज्यामध्ये उपभोग-केंद्रित स्टॉक आणि क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल. बरं,अपेक्षा खूप जास्त आहेत, ज्यामुळे निराशेचा धोका वाढतो, ज्यामुळे पुन्हा एकत्री करण (Consolidation) सुरू होऊ शकते.'
आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'२४५०० पातळीच्या वर राहिल्यानंतर निर्देशांक पुन्हा सावरला आहे, ज्यामुळे तो २४७५० पातळीच्या दिशेने वाढत आहे. तथापि, वरच्या बाजूस, २००-ताशी चालणाऱ्या सरासरीवर त्याला सुरुवातीला प्रतिकाराचा सामना करावा लागला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांक मंदीचा राहिला आहे कारण तो दैनंदिन वेळेत २१ ईएमए (Exponential Moving Average EMA) च्या खाली व्यव हार करत आहे. २४७५० पातळीच्या वर एक निर्णायक हालचाल मजबूत तेजीला चालना देऊ शकते, ज्यामुळे निफ्टी २५००० पातळीच्या दिशेने जाऊ शकतो. नकारात्मक बाजूने, समर्थन २४६५० पातळीवर ठेवले आहे आणि या पातळीच्या खाली ब्रेकमुळे २४५० ० पातळीच्या दिशेने घसरण होऊ शकते.'
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सोन्याचा भाव COMEX वर $3545 आणि MCX वर १०६३०० रूपयांच्या उच्चांकासह सकारात्मक व्यवहार करत होता. डॉलरची कमकुवतपणा, टॅरिफ अनिश्चितता आणि अमेरिका, भारत, रशिया आणि चीनमधील भू-राजकीय स्थिती यामुळे किमती वाढत राहिल्याने त्याची तेजीची गती कायम राहिली आहे. या आठवड्याचे लक्ष अमेरिकेतील प्रमुख डेटा - ISM सेवा PMI, बेरोजगारीचे दावे आणि फेड अधिकाऱ्यांचे भाष्य - यावर आहे जे जवळच्या काळातील भावनांना चालना देईल. अल्पकालीन श्रेणी सकारात्मक राहते, $३४८० वर समर्थन आणि $३५६५ वर प्रतिकार आहे, तर MCX गोल्डला १०५००० पातळीच्या जव ळ समर्थन (Support) आणि १०७५०० पातळीवर प्रतिकार (Resistance) आहे.'
आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'चालू असलेल्या जीएसटी बैठकीवर लक्ष केंद्रित करून बाजाराने थोडीशी मजबूती दर्शविली, ज्यामुळे रुपया ०.१३ ने वाढून ८८.०२ वर पोहोचला. येत्या काही दिवसांत होणाऱ्या निकालांमुळे चलनाला आधार मिळू शकेल. तथापि, सततच्या व्यापार शुल्काच्या चिंता भावनेवर परिणाम करत राहतात, ज्यामुळे रुपयावर दबाव कायम राहतो. जीएसटी सुधारणा घसरणी ला मदत करू शकतात, परंतु एकूण कल कमकुवत राहतो आणि येत्या काही महिन्यांत रुपया ८९.५० च्या पातळीवर पोहोचू शकतो. नजीकच्या काळात, ही श्रेणी ८७.९० - ८८.४५ दरम्यान अपेक्षित आहे.'
त्यामुळे उद्या शेअर बाजारात मोठी हालचाल होण्याची अपेक्षा असून बाजारातील उद्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भूमिका निर्देशांकात महत्वाची ठरेल. उद्या जीएसटी काऊन्सिल बैठकीचे निष्कर्ष समोर येण्याची शक्यता असल्याने उद्या बाजारातील नि फ्टी विशेष निर्देशांकातील चित्र सुस्पष्ट होईल दरम्यान बाजारात कंसोलिडेशनची शक्यता अधिक आहे.