मराठा आरक्षणाच्या जीआरने ओबीसी नेते नाराज, भुजबळांची मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थिती तर हाके संतापले

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेल्या जीआरनंतर मराठ्यांची मुंबई मोहीम फत्ते जरी झाली असली, तरी आता त्याविरूद्ध ओबीसी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.


जीआर काढण्याचा अधिकार मराठा आरक्षण उपसमितीला नाही, शिवाय मागासवर्गीय ठरवण्याचा अधिकार मागासवर्गीय आयोगाला असताना राज्य सरकारने परस्पर निर्णय घेतलाच कसा? असा सवाल ओबीसी नेत्यांनी केला आहे. एकीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही म्हणता आणि दुसरीकडे मराठा समाजाला पाठिमागच्या दाराने प्रवेश कसा काय देता? एखादा जीआर काढताना त्यावर हरकती सूचना मागवणे अपेक्षित आहे, मात्र ही देखील बाब करण्यात आली नाही. केवळ एका समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने निर्णय घेतला का? असे सवाल ओबीसी समाजातील नेत्यांनी सवाल केला आहे.



छगन भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीकडे फिरवली पाठ 


मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यांनी जीआर संदर्भात वकिलांचा सल्ला घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राज्यसरकर प्रती आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीकडेदेखील पाठ फिरवली असल्याचे म्हंटले जात आह.



कोणत्याही जातीला कोणत्याही जातीत टाकता येत नाही- भुजबळ


"काल जो जीआर काढला आहे, त्याबाबत जे ओबीसी नेते आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनात शंका आहे. कोण हरले, कोण जिंकले, हे कळायचे आहे. आम्ही वकिलांचा सल्ला घेत आहोत. असे कोणत्याही जातीला कोणत्याही जातीत टाकता येत नाही. आम्ही न्यायालयात जाणार आहोत. हरकती सुचना नोंदवायला हव्या होत्या," असे मंत्री छगन भूजबळ यांनी म्हटले आहे.



ओबीसी आरक्षण उध्वस्त करणारा जीआर : लक्ष्मण हाके


ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, ओबीसी आरक्षण उध्वस्त करणारा हा निर्णय आहे. हा जीआर संविधानाचे उलंघन करणारा आहे. घुसखोरी करणाऱ्यांना सरकारने सरकारी वाट करून दिली आहे. यावर छगन भुजबळ वगळता कुणी बोलत नाही. मनोज जरांगे यांनी झुंडशाहीच्या जोरावर हे केलं आहे. सरकारने बेकायदा जीआर काढला आहे. विखे पाटीलांनी ओबीसी आरक्षणाच्या गळ्याचा घोट घेतला आहे, असा आरोप हाके यांनी केला आहे.


हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय (जीआर) राज्य सरकारने मंगळवारी जारी केला आणि सातारा तसेच औंध संस्थानच्या गॅझेटियरवर एका महिन्यात अंमलबजावणी करण्याचा शब्दही मंत्रिमंडळ उपसमितीने दिला. सोबतच अन्य सहा मागण्याही राज्य शासनाने मान्य केल्याने मराठ्यांची मुंबई मोहीम फत्ते झाली असली तरी आता न्यायालयातील लढाई जिंकावी लागणार आहे. कारण, ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून न्यायलयात या जीआरबाबत हरकत घेणारी याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,