
Top Picks for Today - कुठले शेअर गुंतवणूकीसाठे चांगले यांची नवी यादी विश्लेषकांकडून जाहीर
कुठले शेअर खरेदीसाठी योग्य?
१) Inox Wind - आयनॉक्स वांईड कंपनीच्या समभागाला (Stock) जेएम फायनांशियलकडून बाय कॉल (खरेदीचा Buy Call) मिळाला आहे. जेएम फायनांशिययचे सुधांशू बन्सल यांनी १५८ रूपये प्रति शेअर खरेदीसाठी हा बाय कॉल दिला असून ब्रोकरेज रिसर्च कंपनीने शेअरबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की,'आजच्या पहिल्या तिमाहीच्या आर्थिक वर्ष २६ च्या कमाईच्या कॉल दरम्यान, आयनॉक्स विंडच्या व्यवस्थापनाने त्यांचे ईबीटा (करपूर्व कमाई EBITDA) मार्जिन मार्गदर्शन १७-१८% वरून १८-१९% पर्यंत वाढवले, तर आर्थिक वर्ष २६ साठी १२०० मेगावॅट आणि आर्थिक वर्ष २७ साठी २००० मेगावॅटच्या अंमलबजावणी मार्गदर्शनाचा पुनरुच्चार केला. विद्यमान ट्रान्समिशन पायाभूत सुविधा आणि हंगामीपणाच्या संकरीकरणावरील अलीकडील CERC परिपत्र काद्वारे समर्थित, तिसऱ्या तिमाहीपासून अंमलबजावणी वाढण्याची अपेक्षा आहे. कंपनीने १२.५ अब्ज रुपयांचा राइट्स इश्यू देखील यशस्वीरित्या पूर्ण केला आहे, ज्यामुळे तिचा ताळेबंद आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे. आमच्या अंदाजानुसार, महसूल/E BITDA/ समायोजित करोत्तर नफा (Adj. PAT) आर्थिक वर्ष २५-२८ दरम्यान ३२%/३१%/३६% च्या सीएजीआर (Compound Annual Growth Rate CAGR) ने वाढण्याचा अंदाज आहे. आम्ही मार्च २०२७ पासून सप्टेंबर २०२७ च्या कमाईपर्यंत सुधारित SOTP-आधारित लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) स्टॉकवर BUY (खरेदी) रेटिंग राखतो.
२) Dr Agrwal Health Care - डॉ अग्रवाल हेल्थकेअर कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस ब्रोकिंग रिसर्च कंपनीने बाय कॉल दिला आहे. सर्वसाधारण बाजार किंमत (Common Market Price CMP) रूपये ४३३ सह ५०३ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price TP) वर बाय कॉल दिला आहे. कंपनीच्या मते आगामी काळात शेअरमध्ये अपसाईड २२% वाढीची (Growth) शक्यता आहे. मोतीलाल ओसवालच्या मते, डॉ अग्रवाल आय हॉस्पिटल (AEHL) चे डॉ अग्रवाल हे ल्थकेअर (AHCL) शी विलीनीकरण (Merger) प्रस्तावित आहे. त्यामुळे कंपनीच्या ऑपरेशनल व आर्थिक गुणवत्तेत (Efficiency) मध्ये वाढ अपेक्षित आहे. याचा गुंतवणूकदारांनाही फायदा होणार असून कंपनीच्या भागभांडवलधारकांना प्रत्येकी २ इक्विटी शेअ रवर अग्रवाल हेल्थकेअर (AHCL) चे २३ इक्विटी शेअर मिळण्याची शक्यता आहे. डॉ अग्रवाल आय हॉस्पिटल सध्या ७०० दशलक्ष रूपयांच्या समभागांची (Stocks) ची प्रेफरंशियल ऑलोटमेंट करणार असून या निमित्ताने कंपनी आपल्या आगामी भांडवली खर्च गरजांसाठी या निधीचा वापर करू शकते. कंपनीचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरणाचे धोरणात्मक ध्येय असून कंपनी आगामी काळात नवीन मायक्रो बाजारात विस्तारीकरण करू शकते. ब्रोकरेज कंपनीच्या मते, कंपनीच्या करोत्तर नफ्यात व महसूलात अनुक्रमे ३९%,२०% वाढ होण्याची शक्यता आहे.
३) Adani Ports and SEZ- अदानी पोर्टस व सेझ कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस ब्रोकिंग रिसर्च कंपनीने बाय कॉल (Buy Call) दिलेला आहे. सर्वसाधारण बाजार किंमत (Common Market Price CMP) सह १३१३ रूप ये प्रति शेअर किंमत लक्ष्य किंमत (Target Price TP) १७०० रूपयांवर कंपनीने बाय कॉल दिला आहे. अदानी पोर्ट ही भारतातील सर्वात मोठ्या ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिकस कंपनी म्हणून ओळखली जाते. ब्रोकरेज कंपनीच्या मते कंपनीने दशकभरात आपला व्यव साय 3X (तीन पटीने) वाढवला आहे. आगामी काळात कंपनीकडून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १० ते १५ अब्ज रूपयांची गुंतवणूक होणार असून आर्थिक वर्ष २०३० पर्यंत कंपनी आणखी ३० अब्ज रूपये गुंतवणूक करणार आहे. कंपनीची मरिन सर्विसेस सेवा तीन पटीने वाढण्याची शक्यता असून देशातील सर्वात मोठी एकत्रित लॉजिस्टिकस (Integrated Logistics) कंपनी होऊ शकते असेही ब्रोकरेजने म्हटले आहे. याशिवाय आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत कंपनीच्या वोल्युममध्ये १०% वाढ अपेक्षित आहे असे कंपनीने म्हटले आहे.