
मोहित सोमण:सकाळच्या सत्रात साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. सरकारने साखर कारखान्यांवर इथेनॉल निर्मितीवरील मर्यादा हटवल्याने साखर कारखाने अथवा कंपन्या कुठल्याही मर्यादेशिवाय इथेनॉल निर्मिती करू शकतात. याच कार णास्तव साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये सकाळी शेअर बाजारात मोठी वाढ झाली आहे. श्री रेणुका शुगर, त्रिवेणी इंजिनिअरिंग, बलरामपूर चिनी, धामपूर शुगर मिल्स कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी ११.३८ वाजेपर्यंत श्री रेणुका शुगर शेअर १४.४५% वाढत ३२.९५ रूपयावर पोहोचला आहे. तर त्रिवेणी इंजिनिअरिंग कंपनीचा शेअर सकाळी ११.३८ वाजेपर्यंत ३.७६% वाढला असून प्रति शेअरची किंमत ३६२.८५ रूपयांवर पोहोचली आहे.सकाळी ११.३८ वाजता बलरामपूर चिनी मिल्स (६.५८%) वाढत ५८८.३० रूपये प्रति शेअरवर गेला आहे. धामपूर शुगर मिल्स कंपनीचा शेअर ११.३८ वाजेपर्यंत १२.५६% उसळून १४१.६२ रूपये प्रति शेअरवर गेला आहे. नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सरकारने सोमवारी साखर कारखाने आ णि डिस्टिलरीजना कोणत्याही प्रमाणात निर्बंधांशिवाय इथेनॉल उत्पादन करण्याची परवानगी दिल्यामुळे शेअर्समध्ये गुंतवणूक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सकाळच्या सत्रात केली आहे.
'साखर गिरण्या आणि डिस्टिलरीजना ESY 2025-26 दरम्यान उसाचा रस/साखर सिरप, बी-हेवी मोलॅसेस तसेच सी-हेवी मोलॅसेसपासून इथेनॉल तयार करण्याची परवानगी आहे'असे अन्न मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले होते. यानंतर मोठ्या प्रमाणात साखर उत्पादकांना उत्पादन क्षमतेत दिलासा मिळाला आहे. त्यात म्हटले आहे की, पेट्रोलियम मंत्रालयाशी सल्लामसलत करून, देशांतर्गत बाजारपेठेत गोड पदार्थाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी विभाग साखरेचे इथेनॉल उत्पादनात रूपांतर करण्याचा वेळोवेळी आ ढावा घेतला जाईल.
सध्याच्या ईएसवाय (ESY) २०२४-२५ दरम्यान, सरकारने इथेनॉल उत्पादनासाठी ४० लाख टन साखरेचे रूपांतर करण्यास परवानगी दिली असून केंद्र इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमांतर्गत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यास वेळोवेळी प्रोत्साहन देत आहे. तसा मानसही केंद्रीय मंत्र्यांनी वेळोवेळी दाखवला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या (OMCs) पेट्रोलमध्ये मिसळलेले इथेनॉल विकतात.सध्याच्या ESY २०२४-२५ दरम्यान, ओएमसी (Oil Marketing Companies OMCs) ने ३१ जुलै २०२५ पर्यंत सरासरी १९.०५% इथेनॉल मिश्रण साध्य केले आहे.त्यामुळेच शेअर बाजाराचे सकाळी सत्र सुरू झाल्यावरच, राष्ट्रीय शेअर बाजारावर (NSE) धामपूर साखर कारखान्यांचे शेअर्स १०% ने वाढून १३८.८० रुपये प्रति शेअरवर, बलरामपूर चिनी मिल्सचे शेअर्स ६% पे क्षा जास्त वाढून ५७६.५५ रुपये, त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीजचे शेअर्स ३६३.३५ रुपये, सुमारे ४% वाढून, तर श्री रेणुका शुगर्सचे शेअर्स ११.५% पेक्षा जास्त वाढून ३२.०७ रुपांपर्यंत वाढले होते.
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारतीय ऊस साखर बाजारपेठेचा आकार ५५.४० अब्ज डॉलर्स इतका असल्याचा अंदाज आहे आणि २०३० पर्यंत तो ६५.७८ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जो २०२५ ते २०३० पर्यंत ४.०५% सीएजीआरने (Compound A nnual Growth Rate CAGR) वाढेल. इथेनॉल मिश्रणावरील सातत्यपूर्ण सरकारी आदेश, मुबलक देशांतर्गत ऊस पुरवठा आणि अन्न प्रक्रिया करणाऱ्यांकडून सतत मागणी या वाढीच्या मार्गाला आधार देते, असे मॉर्डर इंटेलिजेंसच्या अहवालात म्हटले आहे. याम ध्ये पुढे म्हटले गेले आहे की,'गिरण्या जैवइंधन उत्पादनात विविधता आणत आहेत, रोख प्रवाह स्थिर करत आहेत आणि अस्थिर घाऊक किमतींचा धोका कमी करत आहेत. अचूक शेती आणि सूक्ष्म-सिंचनातील गुंतवणूकीमुळे पाण्याचा वापर कमी करताना उसा चे उत्पादन वाढत आहे, ज्यामुळे भारतीय ऊस साखर बाजारपेठेसाठी कच्च्या मालाची सुरक्षा मजबूत होत आहे'.