
प्रतिनिधी:नव्या माहितीनुसार भारतातील आघाडीची ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने नुकतेच पिंकव्हिला (PinkVilla) इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील बहुसंख्य भागभांडवल (Stake) खरेदी केली असल्याचे समजत आहे. पिंकव्हिला हा आघाडीचे डिजिटल इन्फो टेंनमेंट व मनोरंजन मिडियाचे व्यासपीठ असून फ्लिपकार्टने आपल्या विस्तारासाठी हे नवीन पाऊल उचलले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, आपल्या डिजिटल फुटप्रिंटसाठी फ्लिपकार्टने हा निर्णय घेतला. आधीच अस्तित्वात असलेल्या व लौकिक असलेल्या पिंक व्हिलातील भागभांडवल खरेदी आणण्यासाठी हे आर्थिक धोरणात्मक पाऊल उचलले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.यावर कंपनीने म्हटले आहे की ,'ट्रेंड आकारण्यात आणि उपभोग सवयींवर प्रभाव पाडण्यात चित्रपट आणि सेलिब्रिटी महत्त्वपूर्ण भूमिका बजाव तात आणि बहुतेक जनरल झेड वापरकर्ते या थीमवर सामग्री वापरत असल्याने, आघाडीच्या इन्फोटेनमेंट प्लॅटफॉर्मचे संपादन स्वाभाविक आहे कारण फ्लिपकार्टने या प्रेक्षकांमध्ये त्याचे आकर्षण वाढवले आहे. फ्लिपकार्टने केलेले हे संपादन कंपनीला ट्रेंड इनसाइ ट्स मिळविण्याची आणि वाणिज्य संधींसाठी कंटेंट तयार करण्याची संधी देते, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत कंपनीचे स्थान आणखी मजबूत होते.'
या स्टेक खरेदीवर आपले विचार मांडताना फ्लिपकार्टचे कॉर्पोरेट वरिष्ठ उपाध्यक्ष रवी अय्यर यांनी टिप्पणी केली आहे की,'पिंकव्हिलामधील बहुसंख्य भागभांडवलाचे आमचे संपादन हे जनरल झेडशी आमचे संबंध अधिक दृढ करण्याच्या आमच्या ध्ये यातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. पिंकव्हिलाचे मजबूत कंटेंट आयपी आणि त्याच्या निष्ठावंत प्रेक्षकांशी मजबूत संबंध ही अशी मालमत्ता आहे जी वाढीचा प्रमुख चालक म्हणून कंटेंटचा वापर करण्याच्या आमच्या प्रयत्नांना गती देईल.'
तसेच यावर प्रतिकिया देताना पिंकव्हिलाच्या संस्थापक आणि सीईओ नंदिनी शेणॉय म्हणाल्या आहेत की,'फ्लिपकार्टची गुंतवणूक ही आम्ही तयार केलेल्या मजबूत प्लॅटफॉर्म आणि कंटेंटचा पुरावा आहे. आम्हाला विश्वास आहे की फ्लिपकार्टच्या पाठिंब्या ने आम्ही आमचे ऑपरेशन्स वाढवू शकू आणि उच्च-गुणवत्तेची कंटेंट वितरित करत राहू शकू जी आमच्या लाखो वापरकर्त्यांना आवडेल, ज्यामुळे इन्फोटेनमेंटमध्ये आघाडीवर असलेले आमचे स्थान आणखी मजबूत होईल.'
या व्यवहारावर व्यक्त होताना फ्लिपकार्टने म्हटले आहे की, 'कंपनीला ट्रेंड इनसाइट्स मिळविण्याची आणि भारतीय बाजारपेठेत वाणिज्य संधींसाठी कंटेंट तयार करण्याची चांगली संधी आहे.' वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, फ्लिपकार्टने असेही नमूद केले की ट्रेंड आकारण्यात आणि उपभोग सवयींवर (Consumption Pattern) प्रभाव पाडण्यात चित्रपट आणि सेलिब्रिटी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कंपनीने असेही पुढे अधोरेखित केले की बाजारात बहुसंख्य जनरेशन झेड वापरकर्ते असल्याने लोक या थीमवरी ल कंटेंट वापरत आहेत आणि फ्लिपकार्ट या प्रेक्षकांमध्ये आपले आकर्षण वाढवत असल्याने आघाडीच्या इन्फोटेनमेंट प्लॅटफॉर्मचे अधिग्रहण हे एक स्वाभाविक व्यवहार आहे. फ्लिपकार्टने केलेले हे अधिग्रहण कंपनीला ट्रेंड इनसाइट्स मिळविण्याची आणि वाणि ज्य संधींसाठी (Commercial Opportunity) कंटेंट तयार करण्याची संधी देते, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत कंपनीचे स्थान आणखी मजबूत होते असे फ्लिपकार्टने वृत्तसंस्थेमध्ये उद्धृत केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान हा करार अंतिम झाला आहे आणि पारंपारिक बंद होण्याच्या अटींच्या अधीन असल्याचे कंपनीने यावेळी नमूद केली आहे. कंपन्या लवकरच व्यवहार बंद करण्याची अपेक्षा करत असताना अद्याप कितीचा व्यवहार हा झाला हे अद्याप समोर आलेले नाही.