Tuesday, September 2, 2025

पीएम मोदी यांचे सेमीकंडक्टर उत्पादनावर मोठे वक्तव्य म्हणाले 'तो दिवस....' सरकारकडून DLI स्कीमही विचारात

पीएम मोदी यांचे सेमीकंडक्टर उत्पादनावर मोठे वक्तव्य म्हणाले 'तो दिवस....' सरकारकडून DLI स्कीमही विचारात

प्रतिनिधी:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील सेमीकॉन इंडिया २०२५ (Semicon India 2025) मध्ये बोलताना,' तो दिवस दूर नाही जेव्हा भारताने बनवलेल्या छोट्या चिप्समुळे (Semiconductor) जगात बदल होईल. जरी भारताने सेमीकंड क्टर उत्पादनात उशीरा सुरुवात केली असली तरी आता भारताला काही रोखू शकत नाही.' असे विधान केले आहे. कार्यक्रमात बोलताना त्यांनी नुकत्याच भारताच्या वाढलेल्या जीडीपी आकडेवारीला प्रतिसाद देत भारताच्या बदलत्या अर्थव्यवस्थेबाबत भाष्य केले. इंडिया सेमीकॉन २०२५ मध्ये बोलताना त्यांनी सेमीकंडक्टर इकोसिस्टीमसह भारताच्या अर्थव्यवस्थेबातही भाष्य केले आहे.पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की,' आज जगभरात भारतामधील गुंतवणूक करण्यासाठी विश्वास वाढत आहे. भारत सेमीकंडक्टर उत्पाद नासाठी सज्ज झाले आहे. हे उत्पादन भारताला जागतिक स्तरावर मोठ्या उंचीवर घेऊन जाईल. किंबहुना भारत जगातील सर्वात लहान सेमीकंडक्टर चिप बनवण्यासाठी सज्ज आहे ' असे म्हणाले आहेत. पुढे भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले आहेत की ' एप्रिल ते जून तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने मजबूत प्रदर्शन केले. सध्या असलेल्या अर्थव्यवस्थेतील आव्हाने कायम असतानाही अपेक्षेहून अधिक चांगली कामगिरी भारतीय अर्थव्यवस्थेने केली आहे.'

भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) आधारित आकडेवारीवर पंतप्रधान मोदी म्हणाले,'भारताने सगळ्या आर्थिक क्षेत्रात चांगली कामगिरी नोंदवली ज्यामध्ये उत्पादन क्षेत्राचाही मोलाचा वाटा आहे.' डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५०% अतिरिक्त निर्यात शुल्कानंतर हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.सेमीकंडक्टर उत्पादनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विस्तृत भाष्य करताना म्हटले आहे की,' भारतावर जगाचा विश्वास आहे. जग सेमीकंडक्टर उत्पादन भार तात करण्यासाठी सज्ज झाले आहे. सेमीकंडक्टर उत्पादनाचा हा संदेश आपण सेमीकॉन २०२५ माध्यमातून पोहोचवतो आहोत.'

तसेच 'ज्या पद्धतीने भारत विस्तार करतोय ते पाहता भारत सेमीकंडक्टर उत्पादनात जागतिक पातळीवर अग्रेसर असेल. येत्या का ही वर्षांत सेमीकंडक्टर उत्पादनात मोठी वाढ जगभरात अपेक्षित असून १ ट्रिलियन डॉलरहून अधिक वाढ या सेमीकंडक्टर उत्पाद नात अपेक्षित आहे ' असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. सरकारकडून डीएलआय (Design Linked Incentive DLI) सुरु करण्याचा विचार असल्याचा उच्चार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार सेमीकंडक्टर उत्पादनासाठी नव्या फेजची रणनीती आख त असल्याचे या व्यासपीठावर सांगितले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >